Red Okra Farming : लाल भेंडी लागवड करा, होईल भरघोस कमाई; एनएससी देते घरपोच बियाणे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी सध्या अनेक नवनवीन पिके (Red Okra Farming) आपल्या शेतीमध्ये घेत आहेत. विशेष म्हणजे नव्याने घेतल्या जाणाऱ्या पिकांना बाजारात मागणी जास्त असल्याने, त्यांना अधिकचा दरही मिळतो. अशाच एका नवीन लाल भेंडीच्या लागवडीबाबत तुम्ही कधी ऐकलंय का? ऐकले ही असेल तरी बियाणे उपलब्ध होण्याबाबतची अडचण तुमच्यासमोर असेल. मात्र, आता लाल भेंडीचे बियाणे तुम्ही अगदी सहजपणे राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून (एनएससी) मिळवू शकतात. बियाणे महामंडळाने लाल भेंडीचे ‘काशी लालिमा’ या वाणाचे (Red Okra Farming) बियाणे शेतकऱ्यांसाठी आपल्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहे.

कुठे मिळणार बियाणे? (Red Okra Farming In India)

भेंडीची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेष म्हणजे भेंडीला बाजारात बाराही महिने मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्या देशातील अनेक भागांमध्ये शेतकरी लाल भेंडीचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे आता तुम्हीही लाल भेंडीची लागवड करण्याचा विचार करत असाल तर राष्ट्रीय महामंडळाच्या https://www.mystore.in/en/product/nsc-crop-bhindi-red-variety-kashi-lalima संकेतस्थळावर जाऊन हे काशी लालिमा या वाणाचे भेंडी बियाणे उपलब्ध करू शकतात.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडून पसंती

काशी लालिमा या भेंडी वाणाची लागवड ही प्रामुख्याने खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते. त्यामुळे लाल भेंडीचे बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना बियाणे नेमकी कोणत्या हंगामासाठी शिफारस करण्यात आले आहे. हे पाहणे खूप महत्वाचे आहे. दरम्यान, काशी लालिमा हे भेंडी वाण वाराणसी येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेले वाण आहे. ज्याच्या लागवडीची शिफारस उत्तरप्रदेशसह मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांसाठी देखील करण्यात आली आहे. महाराष्ट्रात या लाल भेंडी वाणाला गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांकडून चांगलीच पसंती दिली जात आहे.

काशी लालिमा भेंडी वाणाची वैशिष्ट्ये

  • पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहिल्यास पिकाला फटका बसतो.
  • हे भेंडी वाण लवकर काढणी येते. साधारणपणे 45-50 दिवसांत काढणी सुरु होऊन, जवळपास सहा महिन्यापर्यंत तोडा सुरु राहतो.
  • या वाणाचे 100 ग्रॅम बियाणे सामान्यतः 45 रुपयांमध्ये उपलब्ध असते. जे राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लाल भेंडीचे आरोग्यदायी फायदे

लाल भेंडीचे दर हे सामान्यपणे बाजारात हिरव्या भेंडीपेक्षा अधिक असतात. याशिवाय लाल भेंडीमध्ये पोषकतत्वांचे प्रमाण अधिक असते. लाल भेंडी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. यामध्ये प्रामुख्याने अँटिऑक्सिडंट आणि आर्यनचे (लोह) प्रमाण अधिक असते. ज्यामुळे या भेंडीच्या सेवनामुळे अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. विशेषतः मधुमेह आणि हृदयरोग असणाऱ्यांसाठी या भेंडीचे अनेक फायदे आहेत. परिणामी, उच्चभ्रू लोकांमधून या भेंडीला अधिक मागणी असते. ज्यामुळे दरही अधिक मिळतो.

error: Content is protected !!