Red Radish : लाल मुळ्याची लागवड करायचीये; मागवा ऑनलाईन बियाणे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हिवाळा सुरु झाला की घराघरात आपल्याला मुळा (Red Radish) ही भाजी पाहायला मिळते. देशभरात मुळा लागवड ही संपूर्ण वर्षभर केली जाते. मुळा हे भाजीपाला पीक असल्याने, अगदी कमी कालावधीमध्ये ते काढणीला येते. मागील काही वर्षांमध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून मुळ्याची मागणी वाढली असून, त्याला बाजारात दरही चांगला मिळतो. देशभरात मुळ्याच्या सफेद, काळा, लाल अशा अनेक प्रजाती आहेत. मात्र आता तुम्हालाही लाल मुळ्याची (Red Radish) शेती करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून लाल प्रजातीच्या काशी लोहित या प्रजातीचे बियाणे घरबसल्या मागवू शकतात.

राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून लाल प्रजातीच्या काशी लोहित या प्रजातीचे बियाणे तुम्ही ऑनलाईन देखील मागवू शकतात. तुम्हाला यासाठी बियाणे महामंडळाच्या https://mystore.in/en/product/nsc-crop-radish-variety-kashi-lohit या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. तुम्ही या संकेतस्थळावरून घरबसल्या हे बियाणे मागवू शकता. देशातील कोणत्याही भागात या मुळ्याची लागवड करता येते. त्याची किंमतही पांढऱ्या मुळ्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असते.

कधी करतात लाल मुळ्याची लागवड? (Red Radish Seeds For Cultivation)

लाल मुळ्याची लागवड करण्यासाठी प्रामुख्याने डिसेंबर ते फेब्रुवारी हा काळ उत्तम मानला जातो. काशी लोहित या मुळ्याच्या प्रजातीच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन चांगली मानली जाते. या लाल मुळ्याच्या लागवडीसाठी प्रामुख्याने जमिनीचा सामू हा 5 ते 7.5 इतका असावा लागतो. याशिवाय मुरमाड जमिनीतही याची उत्तमरित्या लागवड करता येते. या लाल मुळ्याची लागवड बियांची लागवड करुन, किंवा नर्सरीत रोपे वाढवूनही करता येते. लागवडीनंतर साधारणपणे 20 ते 40 दिवसांत मुळा काढणीला येतो. या लाल मुळ्याच्या लागवडीतून एकरी 54 क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळते.

कमी खर्चात अधिक नफा

लाल मुळ्याच्या पिकाचे योग्य व्यवस्थापन करुन, चांगला नफा मिळवता येतो. शेतकऱ्यांकडून त्याची फारच कमी प्रमाणात लागवड केली जात असल्याने, बाजारात उपलब्धता कमी राहून त्यास दरही चांगला मिळतो. साधारणपणे पांढऱ्या मुळ्याच्या तुलनेत लाल मुळ्याला बाजारात अधिक पटीने दर मिळतो. त्यामुळे शेतकरी कमी खर्चात लाल मुळा लागवडीतून अधिकचा नफा मिळवू शकतात.

error: Content is protected !!