अबब!! दिवसाला 33.8 लीटर दूध देणारी म्हैस; देशात ठरली No.1

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणातील कैथलच्या बुधा खेडा गावातील म्हैस (Buffalo) देशातील सर्वात जास्त दूध देणारी म्हैस ठरली आहे. रेश्मा (Reshma) असं या म्हशीचे नाव असून ही मुर्राह (Murrah) जातीची म्हैस आहे. ही म्हैस एका दिवसात सुमारे 33.8 लिटर दूध देते. इतकी धार काढण्यासाठी कमीत कमी 2 लोक लागतात. या म्हशीला केंद्र सरकारने देशातील सर्वाधिक दूध देणारी म्हैस असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.

रेश्मा म्हैस हरियाणातील कैथल जिल्ह्यातील बुधा खेडा गावात आहे. संदीप, नरेश आणि राजेश या तीन भावांनी 4 वर्षांपूर्वी हिसारच्या भगना गावातून 1.40 लाख रुपयांना ही म्हैस खरेदी केली आणि तिचे पालनपोषण केले. गेल्या वर्षी रेश्माने एका रेडकूला जन्म दिल्यानंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडून (NDDB) 33.8 लिटर दूध दिल्याबद्दल राष्ट्रीय विक्रमाचे प्रमाणपत्र तिला देण्यात आले. मालकांनी सांगितलं की, रेश्माने पहिल्यांदा मुलाला जन्म दिला तेव्हा तिने 19-20 लिटर दूध दिले. दुसऱ्यांदा आई झाल्यावर तिने 30 लिटर दूध दिले. रेश्मा जेव्हा तिसऱ्यांदा आई झाली तेव्हा तिने 33.8 लिटर दूध देऊन नवा विक्रम केला.

शेतकरी मित्रानो, पशु- खरेदी विक्री करायची असेल तर चिंता करू नका. हॅलो कृषी हे अँप मोबाईल मध्ये install करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही पशूंची खरेदी विक्री तर करू शकताच, याशिवाय तुमच्या आसपास असणाऱ्या पशु डॉक्टरांशी अगदी कमी वेळेत संपर्कसुद्धा साधू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन hello Krushi डाउनलोड करा. App ओपन होताच तुम्हाला पशुपालन आणि पशु चिकित्सक चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करताच तुम्ही तुमच्या आसपासच्या जनावरांच्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. hello Krushi मध्ये तुम्हाला बाजारभाव, शेतजमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज यांसारख्या अनेक सुविधा सुद्धा पाहायला मिळतील

रेशमा म्हशीचे मालक संदीप यांनी रेशमाच्या चाऱ्याबद्दल माहिती देताना सांगितलं की, तिला एका दिवसात 20 किलो पशुखाद्य खायला दिले जाते. ज्यामध्ये मोहरीचे तेल, कोंडा, खनिज, मिश्रण, गूळ इ. गोष्टींचा समावेश असतो. यासोबतच या म्हशीच्या आहारात हिरवा चाऱ्याचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याशिवाय इतर जनावरांप्रमाणे तिला तोच चारा दिला जातो ज्यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होते.

error: Content is protected !!