Twin Calf: ‘सगुणा’ म्हशीने दिला जुळ्या रेडकूंना जन्म!

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: गाय किंवा म्हैस या जनावरांमध्ये जुळे (Twin Calf) जन्माला येणे फार नैसर्गिक बाब आहे, परंतु या घटना फार दुर्मिळ (Rare Incident) असतात हे सुद्धा खरे आहे. अशीच एक घटना चिखली गावचे पोलिस पाटील बाजीराव श्रीपती मोरे यांच्या घरी घडलेली आहे.  

बाजीराव मोरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील मुन्हा जातीची सगुणा म्हैस (Saguna Buffalo) खरेदी केली. या म्हशीने जुळ्या रेडकूंना ((Twin Calf) जन्म दिला. यामध्ये एक मादी व एक नर आहे.

दरम्यान, या गोष्टीचे चिखली परिसरात कुतुहल निर्माण झाले आहे. गावचा औद्योगिक विकास झाला असला तरी चिखलीचे पोलिस पाटील मोरे यांनी शेती मातीशी नाळ जपत शेतीसोबत गायी, गुरे व दुभती जनावरे (Animal Husbandry) पाळण्याचा छंद जोपासला आहे.

या छंदापोटी मोरे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पारनेर येथून ही म्हैस (Buffalo) खरेदी केली. या म्हशीने एकदाच दोन रेडकूंना जन्म दिला. गाय, म्हैस या प्राण्यांमध्ये जुळे जन्माला येणे ही गोष्ट दुर्मिळ समजली जाते. याचा प्रत्यय चिखलीकरांनी पहिल्यांदाच अनुभवला आहे. त्यामुळे याविषयी परिसरात उत्सुकता निर्माण झालेली आहे. जुळ्या पिल्लांना (Twin Calf) पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

म्हैस आणि दोन्ही रेडकूंची प्रकृती स्थिर असून दोन्ही रेडकू सुदृढ आहेत. त्यांच्यावर योग्य उपचार केल्यामुळे घाबरण्याची गरज नाही असे पशुवैद्यकाने (Veterinarian) म्हटले आहे.