Sandalwood Plantation : चंदन शेतीमधून एकरी 4 कोटी रुपये कसे मिळतात? पहा लागवड पद्धत अन नफ्याचं गणित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sandalwood Plantation : सध्या शेतकरी फायदेशीर शेती कशी करता येईल याचा शोध घेत आहे. यापूर्वी ऊस, सोयाबीन यातून शेतकरी चांगला नफा कमवायचे. मात्र आता होणारा खर्च पाहता आणि कमी जमिनीमुळे नफा कमी झाला आहे. अनेकदा आपल्याकडे अशी जमीन असते जी आडमार्गाला आहे किंवा जिथे पाण्याची पुरेशी सोया नाही. तेव्हा आज आम्ही तुम्हाला अशा शेती बाबत माहिती सांगणार आहोत ज्यातून तुम्ही एकरी तब्बल ४ कोटी रुपये नफा कमावू शकता.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

रिस्क घेण्याची तयारी असेल तर चंदन शेती फायदेशीर

शेतकरी मित्रांनो तुम्ही यापूर्वीही चंदन शेतीबाबत ऐकलं असेलच. चनदानाची चोरी होते त्यामुळे अनेकदा आपण त्याची लागवड करणे टाळतो. परंतु चंदनाची चोरी होते कारण त्याला मोठी किंमत मिळते अन त्याची मागणी आहे हि गोष्ट आपण लक्षात घेत नाही. तेव्हा तुमची जर थोडीशी रिस्क घेण्याची तयारी असेल तर चंदन शेती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

चंदन शेती करताना काय विचार करावा?

आपण इतके दिवस शेती करत आहोत. बाजारभाव असो वा हवामान सगळंच नेहमी वरखाली होत असते. शेतकऱ्यांप्रमाणे कोणीच रिस्क घेत नसेल. तर मग एकवेळ चंदनासारखे पीक घेऊन रिस्क घेऊन पाहायला काय हरकत आहे असा विचार तुम्ही करू शकता. जर तुम्ही लावलेल्या ३०० झाडांपैकी ५० झाडे जरी जंगली अन त्याला तुम्ही व्यवस्थित विकू शकला तरी तुम्ही १ कोटी कमावू शकता.

कोणतीही जातिवंत रोपे घेण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

पडीक जमीन किंवा कमी पाणी असलेल्या जागेवर चंदन लागवड करावी

शेतकरी मित्रांनी ज्या जमिनीत तुम्ही चांगले पीक घेऊ शकता त्या जागेवर आह येते सोडून १२ वर्ष उत्पादन यायला लागणारे चंदन लावणे योग्य नाही. मात्र तुमची एखादी जमीन पडीक असेल किंवा कमी पाणी असेल तर अशा ठिकाणी तुम्ही चंदन लावण्याचा विचार करू शकता.

तुम्ही जर शेतकरी असाल आणि अजूनही आमचे Hello Krushi हे ॲप इंस्टॉल केले नसेल तर लगेच हे ॲप इंस्टॉल करा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या ॲपमध्ये नेमकं असं काय आहे? की आम्ही ते इन्स्टॉल करावे तर आम्ही तुम्हाला सांगतो की, आमच्या ॲप मध्ये तुम्ही सरकारी योजनांची अगदी सविस्तर माहिती मिळवू शकता. त्याचबरोबर, रोजचे शेतमालाचे बाजारभाव, हवामान अंदाज, जमीन मोजणी, पशूंची खरेदी विक्री, रोपवाटिकांची माहिती इत्यादी गोष्टींची माहिती तुम्ही अगदी मोफत मिळवू शकत, त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा.

पांढर्‍या चंदनाचे फायदे

पांढर्‍या चंदनाची मागणी देश-विदेशात दिसून येत आहे, अशा स्थितीत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर सौदा ठरू शकतो. चंदनाच्या वाढत्या किमतीमुळे ते आणखी फायदेशीर होत आहे. यासोबतच चंदनाची झाडे वाढवण्यासाठी लागणारा वेळही खूप मोठा आहे, परंतु एकदा का तुम्हाला या व्यवसायात यश मिळालं की तुम्हाला त्याचे फायदे मोठ्या प्रमाणात मिळतात.

चंदन लागवडीची पद्धत

चंदन हे परावलंबी वृक्ष आहे. ते दुसऱ्या झाडाचे अन्न मुळांवाटे शोषून घेते. तेव्हा चंदन लागवड करताना आपल्याला चंदनाला होस्ट घ्यावा लागतो. म्हणजे समजा तुम्हाला एक एकर जागेत चंदन लागवड करायची असेल तर एक एकरासाठी साधारण ३०० चंदनाची रोपे लागतील. १० बाय १२ नुसार तुम्ही चंदनाची रोपे लावून घ्याल. दोन चंदनाच्या मध्ये एक होस्ट घ्यावा. यामध्ये तुम्ही सीताफळ/शेवगा अशा झाडांची निवड करू शकता. दोन सरींमधील अंतर १२ फूट असावे. तसेच अधेमध्ये कडुलिंबाची काही झाडे लावावीत ज्यामुळे चंदनातील तेलाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

चंदनामध्ये घेता येते आंतरपीक

चंदनाचे उत्पन्न मिळाल्या १५ वर्ष वाट पाहावी लागते. मात्र मधल्या काळात तुम्ही आंतरपिकातून चांगले पैसे कमावू शकता. यामध्ये सुरवातीला आंतरपीक म्हणून दोन सरींच्या मध्ये भुईमूग किंवा पपई घेता येते. तसेच दोन सीताफळ, पेरू, शेवगा अशी होस्ट म्हणून लावलेल्या झाडांमधूनही कमाई होते.

एक एकरात किती रुपये नफा?

शेतकरी मित्रांनो एक एकर शेतात साधारण चंदनाची ३०० झाडे लावता येतात. सध्या चंदनाच्या गाभ्याला १ किलो मागे १०,००० रुपये इतका भाव मिळतोय. यानुसार एका जिहादला साधारण सरासरी किमान १० किलो माल निघतो. आपण एक एकरात चंदन लागवड केली असेल तर एकरी तुम्हाला प्रत्येक झाडाचे साधारण किमान दीड लाख यानुसार ३०० झाडांचे ४ कोटी ५० लाख मिळू शकतात. यामधील खर्च साधारण ५० लाख धरल्यास एकरी ४ कोटी नफा मिळू शकतो.

error: Content is protected !!