शेतकऱ्याची पोरं भारीच! शोधलं कांदा पिकाचं नवीन वाण, राष्ट्रपतींकडूनही गौरव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, पारंपरिक शेतीबरोबरच काही नवनवे प्रयोग शेतीमाध्ये होत आहेत. विशेष म्हणजे यात तरुण शेतकऱ्यांचा सहभाग आहे. आज आपण माहिती करून घेणार आहोत संदीप घोले या तरुणाने विकसित केलेल्या कांद्याच्या नवीन वानाबाबत….
पुण्यातील दौंड तालुक्यातील पाटस गावचा हा तरुण शेतकरी आहे. त्याने कांद्याचे नवे ‘संदीप वाण’ विकसित केले असून या वाणाची टिकवणक्षमता सात ते आठ महिने इतके आहे. त्यासोबतच या वाणाची रोगप्रतिकारक क्षमता देखील चांगली आहे. विशेष म्हणजे या संशोधनासाठी संदीप घुले यांना 2019 आली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे.
असा लागला शोध…
अनेकदा कांद्याचे बियाणे खरेदी करताना बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. ही सल संदीप यांच्या मनात होती. म्हणुनच त्यांनी संशोधन करायचा निश्चय केला. त्यांनी संशोधन करत स्वतःच्या नावाची कांद्याची जात शोधून काढली कांदा टिकवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.  कांदा लवकर खराब होत असल्याने दरवाढीचा कधीही फायदा त्यांना झाला नाही म्हणूनच त्यावर पर्याय म्हणून त्यांनी आठ वर्ष संशोधन केलं आणि ‘संदीप कांदा’ या वाणाची निर्मिती केली.
विशेष म्हणजे या नव्या वाणामुळे त्यांच्या उत्पन्नात हेक्‍टरी सात ते आठ टणाचा फरक पडलाय. मार्केटिंग करण्यासाठी संदीप घुले यांनी सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग केला. त्यामुळे त्यांच्यासोबत आठ राज्यातील जवळपास एक हजार पेक्षा जास्त शेतकरी त्यांना जोडले गेले आहेत. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखिले संदीप कांदा या वाणाची लागवड केली आहे.
काय आहेत संदीप वाणाची वैशिष्ट्ये
— या नव्या संदीप वाणाची दखल नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन घेतली आहे.
— या कांद्याची साठवणक्षमता सात ते आठ महिने इतकी आहे.
— हा कांदा इतर कांद्यापेक्षा तीन ते चार महिने जास्त टिकतो.
— या कांद्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!