Sanedo Mini Tractor : शेतकऱ्यांनो ‘या’ मिनी ट्रॅक्टरबद्दल तुम्हाला माहिती आहे का? फक्त ‘इतक्या’ किमतीत मिळतोय, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sanedo Mini Tractor price : आपल्याकडे अनेकजण शेती हा व्यवसाय करतात पूर्वीच्या शेती व्यवसायाबद्दल आणि आताच्या शेती व्यवसायाबद्दल पाहिले तर यामध्ये खूप फरक आहे. पूर्वीची लोक शेतीमध्ये दिवस-रात्र काबाडकष्ट करायची अंग मेहनतीने जास्त प्रमाणात शेती करायचे. मात्र अलीकडच्या काळातील लोक शेती करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अंग मेहनत जास्त करावी लागत नाही त्याचबरोबर शेतीतून नफा देखील चांगला राहतो.

सर्वात कमी किंमतीत शेती उपकरणे विकत घेण्यासाठी इथे क्लिक करून App डाऊनलोड करा

रेच शेतकरी त्यांच्या शेतामध्ये विविध प्रयोग करत असतात. काहीतरी जुगाड करून शेती करण्याचा प्रयत्न शेतकरी नेहमीच करतात. शेतकऱ्यांनी जुगाड केलेले अनेक उपकरणे आपण पाहतच असतो. याविषयीच्या अनेक बातम्या तसेच व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर येत असतात. सध्या देखील एका शेतकऱ्याने केलेल्या जुगाडाची सगळीकडे चर्चा होत आहे.

गुजरात जिल्ह्यातील अमरेली या ठिकाणच्या एका शेतकऱ्याने सेनेडो मिनी ट्रॅक्टर बनवला आहे. त्यामुळे सगळीकडे या शेतकऱ्याचं कौतुक होत आहे. त्यांनी शेतीच्या कामासाठी सेनेडो मिनी ट्रॅक्टर बनवला आहे. या ट्रॅक्टर बद्दल अधिकची माहिती आपण पाहिली तर, हा एक डिझेल इंजिन ट्रॅक्टर आहे त्याची बॅटरी १२ वोल्ट आहे त्याचबरोबर हॉर्स पावर १० एचपीची आहे आणि एक सिलेंडर यामध्ये आहे. त्याचबरोबर इंजिन पावर बद्दल पाहिले तर 510 cc इंजिन पावर आहे.

ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये –

त्याचबरोबर या मिनी ट्रॅक्टरची काही वैशिष्ट्ये पाहिली तर ट्रॅक्टरच्या गियर बद्दल पाहिले तर चार फॉरवर्ड आणि एक रिवर्स गियर ट्रॅक्टर साठी आहे. त्याचबरोबर याची डिझेलची टाकी 15 लिटरची आहे.

ट्रॅक्टरची किंमत किती? (Sanedo Mini Tractor price)

हा ट्रॅक्टर खास शेतकऱ्यांसाठी बनविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना यामुळे मोठा फायदा होत आहे. त्याच्या किमती बद्दल पाहिले तर हा ट्रॅक्टर तुम्हाला एक लाख तीस हजार रुपयापर्यंत मिळू शकेल. त्यामुळे बाकी उपकरणांच्या तुलनेत याची किंमत कमी असल्याने शेतकरी याला खरेदी करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होईल.

शेतकऱ्यांनो कुठे खरेदी करणार हा ट्रॅक्टर?

तुम्हाला जर हा ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर हा ट्रॅक्टर फक्त अमरेली जिल्ह्यातील या शेतकऱ्याकडेच मिळेल. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन हा ट्रॅक्टर खरेदी करावा लागेल. या ट्रॅक्टरला आपण कल्टीवेटर, रोटावेटर सारखी उपकरणे सहजरित्या वापरू शकतो.

error: Content is protected !!