Sangli Bedena Market: सांगलीत बेदाण्याला मिळाला हंगामातील उच्चांकी २११ रुपये दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Sangli Bedena Market) आवारात यंदाच्या वर्षातील बेदाण्याची उच्चांकी ११० टन आवक झाली. नव्या बेदाण्याच्या मुहूर्ताच्या सौद्यात हिरव्या बेदाण्याला २११ रुपये किलो असा दर मिळाला.

कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात तासगाव बेदाणा बाजारपेठेत (Sangli Bedena Market) नव्या बेदाण्याची आवक झाली. बाजारात ११० टन हिरवा बेदाणा आवक झाली. निघालेल्या सौद्यात जानसी ट्रेडिंग कंपनी यांच्याकडे आमसिद्ध शिवप्पा सोरडी रा. घोनसगी जि. विजापूर यांच्या बेदाण्याला २११ रुपये किलो असा दर मिळाला. या हंगामातील हा सर्वाधिक दर मिळाला आहे.

भूपाल पाटील यांच्या धारेश्वर ट्रेडिंग कंपनी या दुकानात लिंगाप्पा सोमलिंग उमराणी रा. जकादबोबलाद (ता. जत) यांच्या बेदाण्याला २०१ रुपये किलो, सतीश माळी यांच्या सतीश ट्रेडिंग कंपनी या दुकानात निघालेल्या नव्या बेदाण्याच्या सौद्यात बसाप्पा शिगोंडी माशाळ रा. बाबानगर, विजापूर यांच्या हिरव्या बेदाण्याला १५१ रू किलो असा दर मिळाला.

राहुल बाफना यांनी तो खरेदी केला. पहिला मुहूर्ताचा सौदा सतीश ट्रेडिंग कंपनी या दुकानात निघाला. या दुकानात ५१ टन आवक झाली. यावेळी बाजार समितीचे उपसभापती रामचंद्र जाधव, सचिव चंद्रकांत सूर्यवंशी संचालक रवींद्र पाटील, खंडू पवार अनिल पाटील, अंकुश माळी, सुदाम माळी, कुमार शेटे.

बेदाणा व्यापारी मनोज मालू, केतन सुचक, राम माळी, सुभाष हिंगमिरे, संजय बोथरा, सुशील हडदरे, राहुल मालू, बबलू पाटील, किरण बोडके जगन्नाथ घनेरे, ओंकार सूर्यवंशी, सहायक सचिव चंद्रकात कणसे उपस्थित होते. आज दिवसभर झालेल्या बेदाणा सौद्या मधे हिरवा बेदाणा ९० ते २११, पिवळा बेदाणा ८७ ते १७५ असा सरासरी दर मिळाला(Sangli Bedena Market) .

error: Content is protected !!