अबब! शेतकऱ्याने पिकवला तब्बल 800 ग्रॅम वजनाचा कांदा; पहा Video

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली । (Sangli News) ब्रम्हनाळ येथील शेतकरी हनुमंत शिरगावे यांच्या शेतात थोडा थोडका नव्हे, तर चक्क पाऊण किलो वजनाचा कांदा पिकलाय. त्याला पहायला आणि हनुमंतरावांचे कौतुक करायला अवघा गाव लोटला आहे. तुम्ही आतापर्यंत जास्तीजास्त ५०-१०० ग्राम वजनाचा कांदा पाहिला असेल, पण या कांद्याने सारेच विक्रम तोडले आहेत.

पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ या गावात राहणाऱ्या हनुमंतरावांनी ऊसात आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली होती. त्यामुळे ऊसासोबतच कांद्यालाही मुबलक खतपाणी मिळत गेले. सध्या उसाच्या भरणीसाठी त्यांनी कांदा काढायला सुरुवात केली. सुरुवातीला १०-१२ मोठे कांदे निघाले. नंतर मात्र सरसकट कांदे असेच वजनदार निघू लागले. गेली अनेक वर्षे कांदा पिकविणाऱ्या शिरगावे यांच्यासाठी ही अनोखी बाब होती. वजन केले असता प्रत्येक कांदा सरासरी चक्क ७५० ते ८०० ग्रॅमपर्यंत वजनदार भरला.

हे तंत्रज्ञान वापरून हायटेक शेतीतून शेतीमधील उत्पन्न करा दुप्पट

शेतकरी मित्रांनो आता शेतीमधील उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणे खूप गरजेचे आहे. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi हे मोबाईल अँप वापरून १ लाख शेतकरी सध्या हायटेक शेती करून अधिक नफा कमवत आहेत. तुम्हीही या शेती उपयोगी मोबाईल अँप च्या मदतीने प्रगतशील शेतकरी बनून शेतीला व्यावसायिक दृष्टीकोन देऊन मोठा नफा कमावू शकता. आजच तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्या. इथे तुम्हाला रोज कृषी तज्ज्ञांचा मोफत सल्ला मिळतो. तसेच तुमच्या जवळील सर्व खात दुकानदारांशी तुम्ही या अँपच्या मदतीने संपर्क करून खाते Online मागवू शकता. शिवाय तुमचा शेतमाल अँपवर विक्रीसाठी पोस्ट करून थेट बांधावर शेतमालाची विक्री करू शकता. यासोबत रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज इथे दिला जातो. तेव्हा आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून या सेवेचा लाभ घ्या.

कांद्याचा फड पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. शिरगावे यांनी सांगितले की, लावणीसाठी बाजारपेठेतून नेहमीचे कांद्याचे रोप आणले होते. उसासोबतच दोनवेळा अळवणी केली. ह्युमिक, फुलविक, सिव्हिडची दोनवेळा फवारणी केली. उसासाठी केलेला हा प्रयोग कांद्यासाठीही लागू पडला. कांद्याच्या या दणदणीत उत्पादनाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदिप राजोबा यांनी शिरगावे यांचा सत्कार केला.

error: Content is protected !!