Sangli News : हळदीचे 18 ते 20 लाख पोत्यांचे असणारे उत्पादन 13 लाख पोत्यांपर्यंत घटले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली । हळदीचे शहर अशी देशभरात सांगलीची (Sangli News) ओळख आहे. याच हळद व्यापाराला चांगले दिवस यावेत यासाठी स्व. वसंतदादांनी सांगलीत मार्केट यार्डाची (Market Yard) आणि हळद वायदेबाजाराची स्थापना केली होती. मात्र अलीकडच्या काही वर्षांत हळदीचे उत्पादन (Turmeric Production) मोठ्या प्रमाणावर घटले आहे. हळदीचे 18 ते 20 लाख पोत्यांचे असणारे उत्पादन 13 लाख पोत्यांपर्यंत घटले असल्याचं म्हणत महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी सरकरने यावर क्रियाशील धोरण बनवण्याची मागणी केली आहे.

सुरुवातीला दीड ते पावणेदोन कोटींची उलाढाल करणारा सांगलीचा हळदव्यापार 600 कोटींच्याही पुढे जाऊन पोहोचला आहे. पण गेल्या काही वर्षात हळदीचे उत्पादन सातत्याने घटत आहे ही चिंतेची बाब आहे. अगदी 5 ते 7 वर्षांपूर्वी 18 ते 20 लाख पोत्यांचे असणारे उत्पादन 13 लाख पोत्यांपर्यंत घटले आहे. सांगलीला येलो सिटी घोषित करण्याची संकल्पना चांगली आहे. पण त्यासाठी हळदीचे उत्पादन वाढविण्याबरोबरच उत्पादनखर्च कमी करण्याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. अन्यथा हळदीचे शहर ही ओळख पुसत चालली असताना नुसतं भिंती रंगवून काहीही होणार नाही असं मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

बाजारभाव चेक करणे, व्यापारी शोधणे यासाठी Hello Krushi अँप चा वापर करा

शेतकरी मित्रांनो शेतीशी निगडित सर्व समस्यांची उत्तरे हॅलो कृषी या मोबाईल अँपवर आहेत. सातबारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्र डाउनलोड करण्यापासून ते शेतजमिनीची मोफत मोजणी, हवामान अंदाज अशा अनेक सेवा Hello Krushi अँप वर एक रुपयाही न भरता मिळतात. तसेच इथे रोजचा बाजारभाव शेतकरी स्वतः चेक करू शकतात. तसेच आपला शेतमाल थेट ग्राहकाला अन व्यापाऱ्याला अँपच्या मदतीने सहज विकू शकतात. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi अँप इन्स्टॉल करून आजच या सेवेचा लाभ घ्या.

दरम्यान, सांगली जिल्ह्यासोबतच कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही हळदीची लागवड वाढत आहे. हळद हे नागडी पीक शेतकऱ्याला चांगला नफा कमावून देत असल्यानं शेतकरी याकडे वळताना दिसत आहेत. मात्र शेतकऱ्यांना हळद लागवडीचे तंत्रज्ञान समजून घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना हळद लागवडीतून मोठ्या नुकसानीलाही सामोरे जावे लागल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे सरकारने हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृतिशील कार्यक्रम आखून त्याची योग्य अंमलबजावणी केली तर याचा हळद उत्पादनावर अतिशय चांगला परिणाम दिसून येईल.

error: Content is protected !!