Sarkari Yojana : प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत फळपीक विमा योजना; मिळणार ‘हे’ लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचे सबलीकरण आणि आर्थिक प्रोत्साहन मिळावे. यासाठी योजनांचे अनुदान देत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत आहे. शेतात केवळ धान्य पिकवून उत्पादन निघत नाही. तर फलोत्पादनातून अधिक नफा मिळतो. यासाठी शासन प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत फळपीक विमा योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाल्याने त्यांच्या फलोत्पादन व्यवसायाला चालना मिळण्यास हातभार लागतो. ही योजना काही फळ पिकांचे उत्पादन मिळविण्यासाठी तत्पर आहे. या योजनेच्या माध्यमातून खालीलप्रमाणे फळांचे उत्पादन घेतले जाते.

फळपीक योजनेत या फळपीकांचे उत्पादन घेतले जाते

या योजनेच्या माध्यमातून संत्रा, लिंबू, द्राक्षे, मोसंबी, चिकू, पेरू, डाळिंब, सीताफळ या फळपिकांचे उत्पादन घेतले जाते. तसेच पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या तीन वर्षांसाठी मृग बहरामध्ये असलेली आठ फळपिके आणि आंबिया बहारमध्ये असलेल्या नऊ फळपिकांसाठी लागू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली. या योजनेची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला शासन दरबारी चकरा मारण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आता मोबाईल ॲपद्वारे देखील सरकारी योजनांचा लाभ मिळवू शकता.

सरकारी अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

मोबाईल ॲपद्वारे योजनांची अशी मिळवा माहिती

शेतकरी मित्रांनो जर अजूनही Hello Krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर प्ले स्टोअरवर जाऊन आजच डाऊनलोड करा. त्यानंतर दहा अंकी मोबाईल क्रमांक भरून इतर माहिती भरावी. Hello Krushi ॲपद्वारे आपल्याला हव्या असलेल्या योजना शोधून एका क्लिकवर माहिती मिळवू शकता.

शेतकऱ्यांना मिळणार लाभ

  • देशात , राज्यात अवकाळी पाऊस किंवा नैसर्गिक आपत्तीत वाढ होताना दिसतेय. याच काळात शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे.
  • पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढवणे.
  • नावीन्यपूर्ण शेती, मशागत, तंत्रज्ञान, सामुग्री वापरण्यास या योजनेच्या मध्यातून हातभार मिळणे.
  • कृषि क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण तसेच कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतु साध्य करणे.
error: Content is protected !!