Sarkari Yojana : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा निधी मंजूर, या शेतकऱ्यांना होणार फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Sarkari Yojana) : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्या योजनांचे निधी कधी येतात, तर कधी फसतात. परंतु आता या योजनेचा १६३ कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे. राज्यातील अनुसूचित जाती – जमाती तसेच नवबौद्ध शेतकर्‍यांना यामुळे फायदा होणार आहे. शासनाच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होनार आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे, त्यांना स्वयंपूर्ण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे या योजनेचा लाभ घेणारे शेतकरी भाग्यवान आहेत अस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

सरकारी योजनेला अर्ज करण्याची सोपी पद्धत कोणती?

शेतकरी मित्रांनो आता कोणत्याही सरकारी योजनेला अर्ज करण्यासाठी तुम्हाला शासन दरबारी चकरा मारण्याची आवश्यकता नाही. आता शासनाचे अनुदान मिळवणे अतिशय सोपे झाले आहे. तुम्ही अगदी घरी बसूनसुद्धा सरकारच्या सर्व योजनेंना अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला Google प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे.

कोणकोणत्या शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळणार? Sarkari Yojana

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत दीड लाख उत्पन्न असणारे अनुसूचित जाती – जमाती, अस्पृश्य, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर असणार आहे. या शेतकरी बांधवांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्त करून मिळणार, शेततळे, सूक्ष्म सिंचन, पंप यासाठी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी २७१.८३०६ कोटी एवढा निधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मान्य झाला आहे. शासन निर्णयान्वये वित्त विभागाने विहित केल्याप्रमाणे या योजनेकरिता एकूण अर्थसंकल्पीय ६० टक्के निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर येते. त्याचप्रमाणे चालू वर्षात १६३ कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

या योजनेतून लाभार्थी शेतकऱ्यांसाठी खालील तरतुदी

 • विहीर : विहिरीसाठी ०.४० हेक्टर मर्यादा लागू राहील. तसेच एकूण ६ हेक्टर क्षेत्र मर्यादा लागू राहील.
 • विद्युत पंप अनुदान : विद्युत पंप संचाकरिता राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत मंजूर झालेल्या मापनदंडानुसार अनुदान दिलं जाईल.
 • सूक्ष्म सिंचन अनुदान : सूक्ष्म सिंचन अनुदान हे प्रधानमंत्री कृषी योजना अधिक पीक योजनेच्या माध्यमातून ५५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतर्फे ३५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
 • नवीन विहीर बांधणी : नवीन विहीर बांधणीसाठी निवडलेल्या स्थळाची पाहणी करून तपासणी देखील करावी. नवीन विहीर बांधताना जुन्या विहिरीचे प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत का ते पाहावे.
 • या योजनेचा GR हा २०२१ – २२ मध्ये शासनमान्यतेने निर्गमित करण्यात आला. आता या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

महाराष्ट्र शासनाच्या योजनेला अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा –

 • सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे ॲप डाऊनलोड करा.
 • यानंतर मोबाईलवर नाव, नंबर टाकून मोफत रजिस्ट्रेशन करा.
 • ॲप ओपन करून होम पेजवरील सरकारी योजना विभागात जा.
 • सरकारी योजना हा पर्याय निवडल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेवर क्लिक करा.
 • त्यानंतर तुम्हाला त्या योजनेबद्दल अधिक माहिती मिळेल.
 • यामध्येच शेवटी Apply Now असे बटन असेल. त्यावर क्लिक करून वैयक्तिक माहिती भरून योजनेचा लाभ मिळवा.
error: Content is protected !!