हॅलो कृषी ऑनलाईन । (Sarkari Yojana) शेती हा बहुसंख्य लोकसंख्येचा प्रमुख व्यवसाय आहे. ग्रामीण भागात शेतकरी शेतीसोबत एखाद्या शेतीपूरक व्यवसायही करतात. यामध्ये कुकूटपालन, पोल्ट्री फार्मिंग, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन आदींचा समावेश होतो. मात्र अनेक शेतकऱ्यांना हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे इच्छा असूनही भांडवलाच्या कमतरतेमुळे शेतीला जोडधंदा करता येत नाही. मात्र आता जर तुम्हाला पशुपालन करून दुग्धव्यवसाय सुरु करायचा असेल तर सरकार जनावरांच्या खेरेदीवर कर्ज देत आहे. आज आपण याबाबत जाणून घेणार आहोत.
अशी करा घरबसल्या जनावरांची खरेदी विक्री
शेतकरी मित्रांनो आता जनावरांची खरेदी विक्री तुम्ही घरी बसूनही करू शकता. Hello Krushi मोबाईल अँप च्या मदतीने आता हव्या त्या जनावरांची कोणत्याही एजंटशिवाय खरेदी विक्री करता येणे शक्य झाले आहे. यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi अँप इन्स्टॉल करून या सेवेचे लाभार्थी बना.
साधारणपणे, गाई, म्हशी, शेळ्या, डुक्कर आणि कोंबडी खरेदी करण्यासाठी खूप खर्च येतो. लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अशा शेतीपूरक व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे भांडवल उभे करणेही कठीण जाते. मात्र आता अशा शेतकऱ्यांनाही जनावरे खरेदी करून आपला व्यवसाय सुरु करता येणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर उंचावण्याच्या हेतूनेच सरकारने जनावरांच्या खरेदीवर कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या अशा अनेक योजना असून तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi हे अँप मोबाईलवर इन्स्टॉल करून घरी बसून त्या योजनांना अर्ज करू शकता.
किती कर्ज उपलब्ध आहे? Sarkari Yojana
पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत, शेतकरी आणि पशुपालकांना बँकेकडून कोणत्याही हमीशिवाय 1 लाख 60,000 चे कर्ज मिळते. जरी कर्जाची रक्कम 3 लाखांपर्यंत वाढविली जाऊ शकते. या कर्जावर शेतकऱ्यांना ७ टक्के व्याज द्यावे लागते. जर तुम्ही मुदतीपूर्वी वेळेवर कर्जाची परतफेड केली तर सरकारकडून 3% ची सूट दिली जाते, म्हणजेच जर अटी व शर्तींचे पालन केले असेल तर फक्त 4% दराने व्याज द्यावे लागेल.
कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?
अॅनिमल केसीसी योजनेंतर्गत, पशु पालकांना एक क्रेडिट कार्ड दिले जाते. जे एटीएम मशीनमध्ये टाकून पैसे काढण्यासाठी वापरले जाऊ शकते. पशु किसान क्रेडिट कार्डद्वारे, गाय खरेदीसाठी 40,783 रुपये, म्हैस खरेदीसाठी 60,249 रुपये, डुक्कर खरेदीसाठी 16,237 रुपये, मेंढी/बकरी खरेदीसाठी 4,063 रुपये आणि कोंबडी खरेदीसाठी 720 रुपये प्रति युनिट कर्ज उपलब्ध आहे. याशिवाय आजार, दुखापत, अपघात किंवा इतर कोणत्याही कारणाने जनावराचा मृत्यू झाल्यास पशु किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने नुकसान कमी करता येते.
अर्ज कसा करायचा?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता कोणत्याही सरकारी योजनेला अर्ज करायचा असेल तर तुम्ही घरी बसून पैसे खर्च न करता सोप्प्या पद्धतीने अर्ज करू शकता. शिवाय Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्र डाउनलोड करता येतात. तसेच रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज स्वतः चेक करता येतो. तुम्ही तुमची शेतजमीनही याद्वारे मोजू शकता. तसेच शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीही याद्वारे करता येते. यासाठी तुम्हाला आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलोअ करायच्या आहेत.
- तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअवर जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करा.
- आता तुमचा मोबाईल नंबर टाकून नाव, वय, आदी गोष्टींची माहिती भरून मोफत मध्ये रजिस्टर करा.
- आता अँप ओपन केल्यानंतर होम पेजवर तुम्हाला सरकारी योजना अशी विंडो दिसेल.
- सरकारी योजना या विंडो मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे सरकारच्या सर्व योजनांची लिस्ट दिसेल. यामधील तुम्हाला हव्या त्या योजनेची निवड करा. तिथेच खाली दिलेल्या Appy बटनावर क्लिक करून तुम्ही मोबाइलरूनच योनजेनेल अर्ज करू शकता.
फादा कसा मिळवायचा?
जर तुम्ही गुरे खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पशु किसान क्रेडिट कार्डसाठी तुमच्या जवळच्या बँक शाखेत किंवा इतर वित्तीय संस्थांमध्ये अर्ज करू शकता. अॅनिमल केसीसीसाठीही ऑनलाइन अर्ज मागवले जातात, ज्यासाठी अर्ज अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करून सबमिट करावा लागतो.
फॉर्मसोबत अर्जदार शेतकरी किंवा पशुपालक यांना जनावरांचे आरोग्य प्रमाणपत्र, जनावरांचा विमा, बँकेचा क्रेडिट स्कोअर, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधारशी लिंक केलेला मोबाइल क्रमांक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सादर करावा लागेल. तुम्हाला परवडणाऱ्या व्याजदरात प्राणी खरेदी करण्यासाठी KCC कर्ज मिळेल. हे कार्ड जारी होताच पशु पालकांना कळविण्यात येते आणि ते थेट निवासस्थानी पोस्टाने पाठवण्याची सुविधाही देण्यात आली आहे.