आता रोबोट करणार शेतकऱ्याला कामात मदत; भारतातील पहिला शेती रोबोटचा प्रयोग महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । Satara News दुष्काळी समजल्या जाणा-या माण तालुक्यातील शेतक-यांना जागतिक स्तरावरील अधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ देण्यासाठी येथील माण देशी फौंऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. अमेरिकेतील अत्याधुनिक स्वयंचलीत रोबोट आता माण तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामात मदत करणार आहे.

आजवर आपण रोबोटचा इतर वापर एकला होता. परंतु हाच रोबोट एकदिवस शेतातील कामही करेल असं कधी स्वप्नातही आलं न्हवते. मात्र सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात आता रोबोट शेतकऱ्यांच्या दिमतीला आला आहे. अमेरिकेहून आणलेला हा रोबोट पिकाची पहाणी करुन पिकावरील रोगाचा प्राद्रुर्भाव व पिक वाढीस गरजेची असलेली खतांची मात्रा याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

हायटेक शेतीसाठी हे मोफत तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवा

शेतकरी मित्रांनो आता आपण वेळेनुसार बदलण्याची गरज आहे. नवीन तंत्रज्ञान वापरून शेतीत नवे बदल करून शेतीला व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. आता Hello Krushi मोबाईल अँप च्या मदतीने शेतकऱ्यांना मोफत हायटेक शेतीचे तंत्रज्ञान वापरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. 7/12 काढण्यापासून जवळच्या खत दुकानदाराला फोन करणे असो किवा रोजचा बाजारभाव जाणून घेण्यासोबत जनावरे, जमीन यांची खरेदी विक्री असो आता सगळं काही एकाच मोबाईल अँपवर उपलब्ध झाले आहे. आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi सर्च करा अन अप इन्स्टॉल करून १ लाख शेतकऱ्यांना जोडले जा.

या रोबोटचे प्रात्यक्षिक सोमवारी माण तालुक्यातील शेतक-यांना दाखविण्यात आले. शेतक-यांच्या पिकाच्या ऊत्पन्न वाढीसाठी शेतातील पिकांची पहाणी करुन संबंधित पिकावर कोणकोणत्या रोगाचा प्रादु्र्भाव झाला आहे, पिकाचा रंग, ऊंची व संबंधित पिक वाढीस कोणकोणत्या अन्यद्रव्य खतांची गरज आहे याचे अचुक विश्लेशन करणारे सॉफ्टवेअर विकसित करुन याचा स्वयंचलीत रोबोट तयार केला आहे.

रोबोट पिकात फिरुन करतो पाहणी

हा चारचाकी रोबोट पिकात फिरुन पाहणी करतो या रोबोटमध्ये ठिकठिकाणी स्वयंमचलीत कॅमेरे असुन कॅमेच्या साह्याने पिकाचे चित्रण करुन पिकाची ऊंची, रंग, जाडी याचेसह पिकावर कोणत्या किड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे हे सांगतो. याबाबतची माहिती रोबोटमधील सॉफ्टवेअरला देताच या माहितीचे अचुकरित्या विश्लेशन करुन हा रोबोट पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अशी आगाऊ माहिती देतो. अमेरिका, ब्राझील, आस्ट्रेलिया या देशात सध्या 120 रोबोट ध्या हे काम करत आहेत.

error: Content is protected !!