खत कंपन्यांकडून होतेय शेतकऱ्यांची लुबाडणूक? कृषी सेवा केंद्रांचा अनुदानित खतांच्या किमतींसाठी बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा (Satara News) : सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना जाहीर करत असते. यासोबत खतांवरही सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. मात्र खत उत्पादक कंपन्या अनुदानित खताबरोबर इतर खते लिकिंग शेतकऱ्यांना लुबाडत असल्याचा प्रकार घडत आहे. यापार्श्वभूमीवर अशा केस मध्ये संबंधित कृषी सेवा केंद्र / खत दुकानदार यांच्यावर सरकारकडून कारवाई केली जात आहे. सरकारने दुकानदारांवर कारवाई न करता संबंधित कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी करत कृषी सेवा केंद्रांनी अनुदानित खतांच्या किमतींसाठी बंद पुकारला आहे.

शासन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान देत आहे. यामुळे बळीराजाची पिळवणूक करणाऱ्या कंपन्यांना वठणीवर आणण्यासाठी सातारा जिल्यातील कृषी सेवा केंद्रांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सातारा जिल्हात कृषी दुकानदार आता आक्रमक झाले आहेत. त्यामुळे विक्रेते रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. जिल्ह्यातील कोरेगाव, वडूजसह तालुक्यातील कृषी दुकानदारांनी मंगळवारी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

शेतकऱ्यांना इथे मिळेल गावाजवळच्या सर्व खत दुकानांची लिस्ट अन फोन नंबर

शेतकरी मित्रांनो आता एखादं खत दुकानदाराकडे आहे कि नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला फुकटचे हेलपाटे घालण्याची गरज नाही. गुगल प्ले स्टोअर वरील Hello Krushi नावाचे अँप मोबाईलवर इन्स्टॉल करून तुम्ही आता तुमच्या गावाजवळील सर्व खत दुकानदार, रोपवाटिका, कृषी सेवा केंद्र यांच्याशी एका क्लिकवर संपर्क करू शकता. तसेच online ऑर्डर देखील करता येते.

परवानाधारक कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून खतविक्री करताना खताबरोबर लिकिंग केल्याची घटना घडल्यास संबंधित विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याचा इशारा हिवाळी अधिवेशनात देण्यात आला होता. हा निर्णय म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी असा आहे. रासायनिक खत विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून अवाजवी लिकिंग करून मनमानी सुरू आहे. यामुळे शेतकरी आणि कृषी सेवाधारक यांच्यात भांडणे लावण्याचा उद्योग कंपनीच्या या धोरणामुळे सुरू आहे. Satara News

पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेती व्यवसाय करताना बळीराजाला कुठेही अडचण येऊ नये म्हणून खतांच्या किमतीमध्ये शासनाच्या माध्यमातून मोठे अनुदान दिले जाते. ही अनुदानित खते बाजारपेठेमध्ये वितरित करताना संबंधित कंपन्यांकडून स्वतः निर्मिती केलेल्या काही खतांचे लिकिंग अनुदानित खताबरोबर केले जाते. खत उत्पादक कंपन्यांकडून व्यावसायिकांना सक्तीने दिलेली लिंकिंग खते कृषी सेवाधारकही शेतकऱ्यांना सक्तीने देत असल्याने बळीराजाची पिळवणूक होत आहे.

कृषी सेवा केंद्रांनी असा वाढवावा आपला डिजिटल व्यवसाय

आपल्या खताच्या दुकानाजवळील अधिकाधिक शेतकरी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी सेवा केंद्रांना Hello Krushi अँपने व्यासपीठ मिळवून दिले आहे. आजच तुमचं दुकान Hello Krushi अँपवर लिस्ट करा अन आमच्या १ लाख शेतकऱ्यांपर्यंत फ्रि मध्ये पोहोचून तुमचा व्यवसाय वाढवा. याकरता गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi अँप इन्स्टॉल करा.

शासन करारानुसार खते थेट कृषी सेवा केंद्रांच्या काउंटरपर्यंत द्यावीत.

प्रक्रियेचा खरा सूत्रधार हे मुख्य खत वितरण कंपन्या असतानाही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये कृषी सेवा केंद्रधारकांना उभे केले जात आहे असा आरोप विक्रेते करत आहेत. याबाबतचा मुद्दा नुकताच हिवाळी अधिवेशनामध्ये गाजल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी कोणताही अभ्यास न करता थेट कृषी सेवा केंद्रावर कारवाईचा बडगा उचलला आहे. शासन करारानुसार खते थेट कृषी सेवा केंद्रांच्या काउंटरपर्यंत द्यावीत अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.

error: Content is protected !!