Good News : शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय! सॅटेलाईटच्या मदतीने तुमच्या शेतजमीनवर ठेवणार लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । भारत हा कृषिप्रधान (Agriculture) देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात शेती हा प्रमुख व्यवसाय (Business) असणारी लोकसंख्या मोठी आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार नेहमीच नवनवीन योजना घेऊन येत असते. यातून शेतकऱ्यांचा अधिकाधिक नफा (profit) कसा करून देता येऊ शकतो यावरही काम केले जाते. आता शेतकऱ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सॅटेलाईटच्या (Satelite Mapping) मदतीने तुमच्या शेतजमिनीवर लक्ष ठेऊन शेतमालाला अधिक भाव मिळवून देण्यासाठी शासनाने एक विशेष योजना आखली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱयांनी काय करावं?

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दर्जेदार तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. यासाठी तुमच्याकडे मोबाईल (mobile) असणे आवश्यक आहे. तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi नाव सर्च करून हॅलो कृषी मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या. इथे तुमची शेतजमीन रजिस्टर करा. यामध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा, भू नकाशा आदी गोष्टी सहज डाउनलोड करता येतात. यासोबत कोणत्याही बाजारसमितीमधील हव्या त्या शेतमालाचा रोजचा बाजारभाव तुम्ही स्वतः चेक करू शकता. सॅटेलाईटच्या मदतीने तुम्ही तुमची शेतजमीनही मोजू शकता. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हॅलो कृषी मोबाईल अँप वरून तुम्ही आपला शेतमाल कोणत्याही एजंटविना थेट ग्राहकाला विकू शकतो. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

राज्यात अन्नधान्याचा तुटवडा भासणार नाही याचीही काळजी सरकारला घ्यावयाची असते. यासाठी सरकार कोणत्या अन्नधान्याचे देशात किती उत्पादन होईल याचे अंदाज घेत असते. मात्र आपला अंदाज चोख यावा याकरता अद्याप विशेष तंत्र अवलंबले जात नाही. काही राज्ये यासाठी आजच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे काम सोपे करत आहेत. सध्या अनेक राज्यांत उपग्रहाच्या साहाय्याने शेतीचे सर्वेक्षण केले जाते. यामध्ये कर्नाटकात नंतर आता उत्तर प्रदेश हे सुद्धा या तंत्राचा वापर केला जात आहे. Satelite Mapping

ADVT

उत्तर प्रदेशातील बहुतांश भागात वेवेगळ्या पिकांची लागवड केली जाते. पण बारकाईने पाहिल्यास सरकारकडे योग्य आकडेवारी उपलब्ध नाही. राज्यात कोणत्या शेतकऱ्याकडे किती शेतजमीन आहे आणि तो तेथे कोणती पिके घेतो हि माहिती नसल्याने सरकारला नियोजन करण्यास व्यत्यय येतो आहे. मात्र महाराष्ट्रातील शेतकरीही हॅलो कृषी या मोबाईल अँपचा वापर करून प्रगतशील शेती करू शकतात.

या नवीन तंत्रज्ञानाच्या (Technology) साहाय्याने उपग्रहावरून फील्ड मॅपिंग केले जाते. त्या आधारे कृषी विभागाकडे सर्व शेतकऱ्यांची माहिती जमा होते. राज्यातील जिल्हानिहाय, गटनिहाय, गावपातळी, शेतकऱ्यांकडे किती एकर जमीन आहे आणि ते कोणते पीक घेतात अशी सर्व माहिती शासनाकडे जमा होते. एकदा का हि माहिती अवगत झाली कि त्यानुसार सरकारला कृषी धोरण आखता येते.

शासनाने मंजूर केले सॅटेलाइट मॅपिंग (Satelite Mapping)

उत्तर प्रदेशचे कृषी मंत्री सूर्य प्रताप शाही यांनी सॅटेलाइट मॅपिंगला मंजुरी दिली आहे. इतर अनेक कामांप्रमाणे सॅटेलाइटच्या मदतीवरही अधिकाऱ्यांची नजर असते. त्याचप्रमाणे कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या शेतावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. या आकडेवारीच्या आधारे सरकार आता राज्यातील शेतकऱ्यांना खते, रसायने, बियाणे आणि शेतीशी संबंधित अनेक गोष्टी उपलब्ध करून देणार आहे. या मदतीने आता शेतकऱ्यांना योग्य वेळी पिकांच्या निवडीची अचूक माहिती सहज मिळणार आहे.

error: Content is protected !!