Seed Subsidy Scheme : हे सरकार शेतकऱ्यांना देतंय मोफत बी-बियाणे; काय आहे योजना?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । (Seed Subsidy Scheme) शेती करत असताना चांगले उत्पादन घ्यायचे झाले तर बियाणे उच्च दर्जाचे असणे खूप गरजेचे आहे. आपण कसले बियाणे वापरतो यावरच शेतीमधील उत्पादन अवलंबून असते. शेतकऱ्यांना सुधारित वाणाचे बियाणे बाजारातून घ्यायचे म्हटले तर खूप महाग पडते. शेतकऱ्यांची हि अडचण ध्यानात घेऊन आता सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. राजस्थान सरकारने शेतकऱयांना मोफत बी बियाण्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या विविध राज्यांमध्ये बियाणे अनुदान योजना राबवल्या जात आहेत. या धर्तीवर राजस्थान सरकारने किसान साथी योजना आणि मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी आणि शेतकरी गटांना मोफत बियाणे वितरित केले जातात. यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगल्या दर्जाचे बियाणे मिळून अधिक उत्पादन मिळण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र सरकारसुद्धा यासाठी बियाणे अनुदान योजना राबवत आहे.

अशी खरेदी करा कमी किंमतीत दर्जेदार बियाणे अन रोपे

शेतकरी मित्रांनो आता दर्जेदार बियाणे अन रोपे कमी किमतीत उपलब्ध होणे शक्य झाले आहे. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँपवर शेतकऱ्याला त्याच्या जवळच्या सर्व रोपवाटिका मालकांशी सहज संपर्क करण्याची सुविधा आहे. शिवाय या अँपवर थेट विक्रेत्याकडून शेतकऱ्याला सेवा पुरवली जात असल्याने मोठा डिस्काउंट मिळतो आहे. शेतकरी सुद्धा आपले बियाणे या अँपवरून थेट विक्री करत आहेत. यासोबत Hello Krushi अँपवर रोजचा बाजारभावहि चेक करता येतो. सतसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा डाउनलोड करता येतो. आजच तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.

बियाणे अनुदान योजना 2022 अर्ज प्रक्रिया

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बियाणे अनुदान योजना 2022 अंतर्गत अर्ज हा Maha Dbt Farmers Portel वर ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. Biyane Anudan Yojana अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम महाडीबीटी शेतकरी पोर्टल वर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून घ्यायचे आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून अर्जाची फी सुद्धा ऑनलाईन पेड करायची आहे. शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर त्यांना संदेश प्राप्त होईल.

गटातील शेतकऱ्यांना मोफत बियाणे

मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजनेंतर्गत, कृषी विभागाने 30 ते 50 शेतकऱ्यांचे गट तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकरी गट परस्पर सहकार्याने शेती करतील अशी आशा सरकारला आहे. कृषी विभाग या शेतकऱ्यांच्या गटांना RSSC मार्फत मोफत बियाणांचे वाटप करते. यानंतर शेतकऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाते. त्यानंतर शेतकरी बियाणे तयार करून विक्री करू शकतात.

या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान

मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजनेंतर्गत, लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना ५०% अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिले जाते, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना २५% अनुदानावर बियाणे पुरवठा सुनिश्चित केला जातो. अनेक वेळा राजस्थान सरकार शेतकऱ्यांना मोफत बियाण्याचे मिनी किटसुद्धा पुरवते. या योजनांमध्ये राष्ट्रीय तेलबिया आणि तेल पाम मिशन आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान यांचाही समावेश आहे. राजस्थानातील विविध भागातील माती आणि हवामानाच्या आधारे पिकाच्या बियांची निवड केली जाते. Seed Subsidy Scheme

बीज स्वावलंबन योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो

मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजनेंतर्गत, दारिद्र्यरेषेखालील SC, ST, अल्प व अत्यल्प, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकर्‍यांना प्राधान्याने बियाण्याचे मिनी किट वितरित केले जातात. यामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची असणाऱ्या शेतकऱ्यांना सुधारित वाणाचे बियाणे मिळून त्यांचे उत्पादन वाढवण्यास मदत होते.

error: Content is protected !!