साखरेचा विक्री दर 3600 रूपये करावा : मंत्री अतुल सावे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊसावरील वाजवी आणि किफायतशीर किंमती (एफआरपी)वरील व्याज 15% टक्के वरून 7.5% टक्के करावे, यासह साखरेवरचा विक्री दर 3100 रुपयांवरून 3600 रूपये करावा, अशी मागणी आज राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी राष्ट्रीय सहकार परिषदेत केली.नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय सहकार मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय सहाकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये सहकार विद्यापीठ असावे अशी मागणी केली. या माध्यमातून कौशल्य आधारित शिक्षण पुरविले जाईल, ज्यामुळे सहकार क्षेत्रातील त्रृटी दूर केल्या जातील. तसेच सहकार क्षेत्रात होणारे संगणकीकरण आणि डिजीटायझेशन करण्यास मदत होईल, संगणकीकरणासाठी 60:30:10 प्रमाणात निधी उभारला जाईल संगणकीकरणासाठी केंद्रशासनाकडून 60% टक्के निधी मिळणार असून राज्य सरकार 30% टक्के निधी आणि नाबार्ड 10 % टक्के निधी खर्च करणार याबाबत आज निर्णय घेण्यात आल्याचे श्री सावे यांनी सांगितले.

क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (CIBIL), पतसंस्थांना लागू अशी महत्वपूर्ण मागणी श्री सावे यांनी आज परिषदेत केली. कृषी पत संस्था या कर्ज पुरवितात. सीबील ही प्रक्रीया पत संस्थांमध्ये नसल्यामुळे जुन्या कर्जांची परत फेड न करणा-यांनाही कर्ज पुरविले जाते. त्यामुळे पत संस्थांवर नादार होण्याची वेळ येते. पत संस्थांनाही सीबील लागू झाल्यास कर्ज देणे पत संस्थांना सोयीचे होईल, त्यामुळे पतसंस्थाना सीबील लागू करावे, अशी मागणी श्री सावे यांनी बैठकीत केली. सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये सामुदायीक सेवा सुविधा पुरविल्या जातात. यासाठी राज्यांमध्ये मोफा ॲक्ट (महाराष्ट्र फॅल्ट वोनरशीप ॲक्ट 1963) लागू आहे. या अंतर्गत सरकार डीम्ड कन्वेयंस च्या माध्यमातून इमारती आणि जमीनीचा हक्क सहकारी संस्थांना देते. प्रलंबित डीम्ड कन्वेयंस प्रदान करण्यासाठी राज्य सकाराला कालबध्द मर्यादा केंद्रशासनाकडून देण्यात यावी, अशी मागणी श्री सावे यांनी केली.

या कार्यक्रमाची अध्यक्षता केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केली. यावेळी केंद्रीय सहकार राज्य मंत्री बी.एल वर्मा , विविध राज्यांतील तसेच केंद्रशासित प्रदेशातील सहकार मंत्री, वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. ज्याचे सहकार मंत्री श्री सावे, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे या परिषदेस उपस्थित होते. यावेळी श्री सावे यांनी राज्यातील सहकार क्षेत्राने केलेल्या नेत्रदिपक प्रगतीचा आलेख मांडला तसेच काही सूचना आणि राज्याच्या हिताला आवश्यक मागण्याही केल्या.

Leave a Comment

error: Content is protected !!