Sericulture Farming : पूर्वीच्या काळी शेतीमध्ये काही मोजक्याच पिकांचे उत्पादन घेतले जात असत. या पिकांना निश्चित परतावा मिळत नव्हता, त्यामुळे उत्पन्न कमी निघत असायचे. परंतु आता शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पिकांना बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यापैकी एक म्हणजे रेशीम शेती. योग्य नियोजन केले तर तुम्ही या शेतीतून लाखोंची कमाई करू शकता.
असे करा व्यवस्थापन
- जर तुम्हाला चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर तुतीचा उत्तम दर्जाचा पाला महत्त्वाचा आहे. त्यासाठी बागेचे व्यवस्थापन देखील महत्त्वाचे आहे.
- कोष काढणी सुरू झाल्यानंतर लगेचच तुती बागेची छाटणी करावी.
- छाटणी करून बागेतील सऱ्यामध्ये नांगरणी, वखरणी करून खताच्या मात्रा द्याव्या.
- छाटणीनंतर दीड महिन्याच्या कालावधीत पाने कीटकांना खाद्यासाठी तयार होतात.
- कोष काढणी पूर्ण झाल्यानंतर संगोपनगृहाची साफसफाई, निर्जंतुकीकरण करावे.
- चॉकी आणल्यानंतर रेशीम कोष उत्पादनाची पुढील बॅचला सुरुवात होते.
- हे लक्षात ठेवा की चॉकी अवस्थेत रेशीम कीटकांची विशेष काळजी घ्यावी.
अशी करा सुरुवात
खरंतर रेशीम उद्योग करत असताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. एका खोलीच्या आत कीटक पाळण्यात येतात. सर्वात अगोदर तुतीच्या पिशव्या टाकाव्यात, जेणेकरून कीटकांना पाने खाता येतील. हे लक्षात ठेवा की या खोल्यांमध्ये शुद्ध हवा आणि प्रकाशाची व्यवस्था करावी. या खोलीत लाकडी ट्रायपॉड्सच्या वर ट्रे ठेवावे. या ट्रायपॉड्सचे मुंग्यांपासून संरक्षण करण्यासाठी त्याखाली पाण्याने भरलेले भांडे ठेवा.
वैशिष्ट्य
- हा शेतीवर आधारित कुटीर उद्योग आहे.
- तुम्ही कमी खर्चात हा व्यवसाय सुरु करू शकता. विशेष म्हणजे याचे उत्पादन लवकर सुरू होते
- शेती आणि इतर घरगुती कामांसोबत हा व्यवसाय चालू करता येतो.
आमच्या Hello Krushi अँपबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
शेतकरी मित्रांनो तंत्रज्ञानाने खूप खूप प्रगती केली आहे. याच गोष्टीचा विचार करून आम्ही खास शेतकऱ्यांसाठी Hello Krushi हे बनवले आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री, बाजार भाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा या सर्व गोष्टींची माहिती अगदी मोफत मिळू शकता. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. दोन लाख शेतकरी याचा लाभ घेत आहे तुम्ही देखील याचा लाभ घ्यावा.
उत्पन्न
रेशीमचं प्रमाण साधारणत 18 ते 22 टक्के इतके असते. यातून एका महिन्यामध्ये 250 ते 300 किलोपर्यंत कोष मिळतात. याला बाजारामध्ये 300 ते 550 रुपये किलोचा दर मिळातो. अडीच महिन्यात एक उत्पादन घेता येते. एकरी वीस हजाराचा खर्च जाऊन तुम्हाला यातून अडीच लाखांचं उत्पन्न सहज मिळेल.
रेशीम लागवडीचे प्रमुख केंद्र
मराठवाडा हे सध्या रेशीम लागवडीचे प्रमुख केंद्र बनण्याच्या मार्गावर असून औरंगाबादमधील देओगाव या लहानशा गावातील अनेक शेतकऱ्यांनी रेशीम लागवडीचा प्रयोग केला आहे. हा नवीन प्रयोग यशस्वी करण्यासाठी या शेतकऱ्यांनी कठोर परिश्रम तसेच प्रगत पद्धतींवर जास्त भर दिला आहे.