Shadenet technology । सध्याच्या काळामध्ये तुमच्याकडे किती शेती आहे याला महत्व नसून तुम्ही ती शेती कशी करतात याला देखील खूप महत्त्व आहे. सध्या अनेकजण तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नफा देखील चांगला मिळत आहे. सध्या युवा पिढीचा शेतीकडे कल वाढत चाललेला दिसत असून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून ते चांगले उत्पन्न देखील घेत आहेत. मागच्या काळामध्ये शेतकरी अंग मेहनत करून कष्ट करून शेतात उत्पन्न वाढवायचे. मात्र सध्याचे युवा शेतकरी हे आधुनिक प्रकारची शेती करून चांगला नफा कमवत आहेत.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
सध्या तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीच क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत आहेत. यामध्ये शेडनेट तंत्रज्ञानाचा वापर हा शेतकऱ्यांसाठी एकदम फायद्याचा ठरत आहे. शेडनेटमुळे तुम्हाला कोणतीही पिके कोणत्याही हंगामामध्ये घेणे शक्य होत आहे. त्यामुळे तुम्हाला याचा देखील चांगला फायदा होत आहे. जर तुम्ही शेडनेट तंत्रज्ञानाचा व्यवस्थित वापर केला तर तुम्हाला यामधून भरघोस उत्पन्न मिळते.
औरंगाबादच्या शेतकऱ्याने मिरची आणि काकडीतून कमावला पाच लाख रुपयांपर्यंत नफा
शेडनेट तंत्रज्ञानाचा वापर करून औरंगाबाद जिल्ह्यातील लाडसांगवी गावच्या एका शेतकऱ्याने चांगला नफा कमवला आहे. या शेतकऱ्याने शेडनेट तंत्रज्ञानाचा वापर करून अर्ध्या एकरामध्ये काकडी लावली आणि अर्धा एकरामध्ये शिमला मिरचीची लागवड केली होती. यामधून त्यांनी चांगले भरघोस उत्पादन घेत सहा महिन्यांमध्ये काकडीतून साडेतीन लाख रुपये तर शिमला मिरची मधून दोन लाख 55 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे सगळीकडे कौतुक होत आहे.
शेडनेट मुळे तापमान नियंत्रित राहिल्याने काकडीचे फळ देखील चांगले दर्जेदार आले. त्यामुळे त्यांच्या काकडीला देखील चांगला भाव मिळाला. त्यांनी आतापर्यंत दर्जेदार काकडीचे उत्पादन घेतले असून 22 रुपये किलो दराने त्यांनी काकडी विकली आहे. फक्त काकडी आणि शिमला मिरचीच नाही तर या एक एकर वरील शेडनेट शिवाय त्यांनी सतरा एकर जमिनीवर डाळिंब, मोसंबी आणि टरबुजाच्या फळांची लागवड केली आहे.
शेडनेट तंत्रज्ञानाचे महत्त्व नेमके काय?
शेडने तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतकऱ्यांचा खर्च खूप कमी होतो यामुळे शेतकरी खत, पाणी, कीटकनाशके यांचे वापरण्याचे प्रमाण देखील करू कमी करू शकतात त्यामुळे उत्पादन खर्चाची खूप बचत होते आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. त्याचबरोबर या तंत्रज्ञानामुळे पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता देखील सुधारते. त्यामुळे या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी शेडनेट तंत्रज्ञान खूप महत्त्वाचे आहे.