मनरेगा अंतर्गत मिळणार पशुपालनासाठी निवारा; शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागात कृषी व्यवसायाला अधिक चालना मिळत आहे. यामुळे आता सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देत असून नवनवीन योजनांचा लाभ देत आहेत. याचा फायदा आता शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. शेती व्यवसायात काही जोडधंदे देखील आहेत. जसे की, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळीपालन या व्यवसायांचा समावेश होतो. यामधून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न भेटते. आता मनरेगा अंतर्गत पशुपालनासाठी निवारा मिळणार आहे.

‘मनरेगा’द्वारे पशुसंवर्धन राबवण्यात येणार :

मध्यंतरी सरकारने पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचे ‘मनरेगा’त अभिसरण करण्याचा निर्णय घेतला होता. अशातच आता पशुसंवर्धनाच्या योजना ‘मनरेगा’द्वारे राबवण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील पशुसंवर्धन विभागाकडून योजना राबवण्यात येतात. दुधाळ जनावरांचे गटवाटप करून शेळी, मेंढीपालन व्यवसाय यांचा समावेश होतो. या योजनेमुळे अनेक अल्पभूधारक आणि दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन मिळाले.

या योजनेच्या माध्यमातून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवतील. यामुळे चांगला आर्थिक स्थर देखील उंचावेल. असा निष्कर्ष राज्य शासनाकडून प्राप्त झाला आहे. यामुळे आता या योजनेच्या माध्यमातून शेळीपालन, मेंढीपालन गटाचे लाभार्थ्यांकडून बंदिस्त शेळीपालन होत नाही. मोकळ्या रानात सोडल्याने योग्य आहार मिळत नाही. याचा परिणाम जनावरांच्या दुधावर होतो. यामुळे दुधाला फारसा दर मिळत नसून दूध पुरेसं मिळालं नाही, तर त्याचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या दुग्धव्यवसायावर होतो.

शेळ्या – मेंढ्यांच्या वजनात योग्य वाढ नाही; दुधाची बोंब :

दरम्यान शेळ्या मेंढ्यांच्या वजनात योग्य प्रमाणात वाढ होत नसून दुधाचीही बोंब दिसते. यामुळेच आता मनरेगा अंतर्गत बंदिस्त पशुपालन केले जाणार आहे. यामुळे आता मनरेगा माध्यमातून विविध योजना पशुसंवर्धनाच्या योजनेला गती मिळावी. यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!