शेतकरी अपघात विमा योजना : शेतकरी हा बळीराजा आहे. तो जगाचा पोशिंदा आहे. शेतात कष्ट करताना येणाऱ्या समस्या नैसर्गिक आपत्तीला त्याला बऱ्याचदा तोंड द्यावं लागतं. अनेकदा त्याचा मृत्यू देखील होतो. यामुळे त्याचे कुटुंब निराधार होते. या संकटातून वाचवण्यासाठी ‘शेतकरी जनता अपघात विमा’ योजना राबवण्यात येत आहे. शेतकरी विमा योजनेला कोणते शेतकरी पात्र आहेत? यामध्ये कोणकोणते अपघात समाविष्ट होतात? हा विमा कधी दिला जाईल? याबाबत आम्ही या अपडेटमध्ये सविस्तर माहिती दिली आहे.
हे असतील लाभार्थी
शेती हा व्यवसाय करत असताना बऱ्याचदा कोणती नैसर्गिक हानी होईल हे सांगता येत नाही. वीजेचा झटका, सर्पदंश, विंचुदंश, अपघात, जनावराने चावल्यावर, इतर कोणत्याही प्रकारचा मृत्यू शेतकऱ्याला आल्यास या अपघात विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल. परंतु जर विम्याच्या पूर्वीचे अपंगत्व, मृत्यू, अपघात, अन्य नैसर्गिक मृत्य, रक्तस्त्राव, अंमली पदार्थाचे सेवन करून मृत्यू झाला असेल तर तो शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकत नाही. या योजनेसाठी काही विशिष्ठ अशा कागदपत्रांची नोंद असणे देखील गरजेचं आहे.
असा करा योजनेला Online अर्ज
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर शेतकरी विमा योजनेला अर्ज करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एक सर्वात सोपी पद्धत सांगणार आहोत. आता तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेला घरी बसून ऑनलाईन अर्ज करू शकता. आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी Hello Krushi अँपच्या मदतीने सरकारी योजनेला अर्ज करून आर्थिक लाभ मिळवला आहे. तेव्हा आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
- सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करा.
- यानंतर अँपवर मोबाईल नंबर, नाव आदी माहिती भरून मोफत रजिस्ट्रेशन करा.
- आता अँप ओपन करून होम पेजवरील सरकारी योजना या विभागात जा.
- सरकारी योजना विभागावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व शासकीय योजनांची यादी दिसेल. यामध्ये शेतकरी विमा योजना निवडा.
- आता इथे तुम्हाला योजनेबाबतची सविस्तर माहिती वाचता येईल. याखाली Apply Now असे बटन आहे. त्यावर क्लिक करून अधिक माहिती भर.
विम्यासाठी आवश्यक कागदपत्रे
विमा मिळवण्यासाठी ७/१२ वरील १० ते ७५ वयोगटातील महाराष्ट्रातील महिला आणि पुरुषांना ही योजना लागू झाली आहे. शेतकऱ्यांच्या वतीने विम्या हप्त्याची रक्कम शासन विमा कंपनीस अदा करते.
शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांनी विहित नमुना दाव्यासाठी अर्ज करावा लागेल. अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव, फेरफार नमुना, शेतकऱ्यांचे वारस म्हणून तलाठी यांच्याकडील गाव नमुना,वारसाची नोंद, कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर केलेले प्रतिज्ञापत्र हे कागदपत्रे मुळ स्वरुपात सादर करावेत.
तसेच शेतकऱ्याचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, राजपत्रित अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेले ग्रामपंचायत प्रमाणपत्र, शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी राजपत्रित अधिकाऱ्याने साक्षांकित केलेला कोणताही एक पुरावा जोडणे आवश्यक आहे. हे सर्व कागदपत्र तालुका करू अधिकाऱ्याकडे जमा करावा. ही कागदपत्रे जमा केल्यास योजनेचा लाभ मिळण्यास सोयीचे जाईल.
शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
या योजने अंतर्गत शेतकऱ्याचा एक डोळा निकामी झाल्यास, एक अवयव निकामी झाल्यास किंवा दोन डोळे निकामी झाल्यास, दोन अवयव निकामी झाल्यास नुकसान भरपाई ही १ लाख रुपयांपर्यंत दिली जाते. १ डोळा किंवा १ अवयव निकामी झाल्यास ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाईल. तसेच एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्याच्या वरसाने भरपाईसाठी दावा करणे गरजेचे आहे.