Shetkari Samman Yojana Work: अपुऱ्या मनुष्यबळामुळे शेतकरी सन्मान निधीच्या कामावर कृषी विभागाचा बहिष्कार!  

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: संपूर्ण राज्यभरात शेतकरी सन्मान निधीच्या कामावर (Shetkari Samman Yojana Work) कृषी विभागाने बहिष्कार टाकला आहे. यामुळे राज्यभरातील शेतकरी (Farmers In Trouble) अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे डेटा एंट्रीतील चुका आणि ईकेवायसी दुरूस्तीचे काम (ekyc work) थांबले आहे.

यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. शेतकरी सन्मान योजनेसाठी राज्यभरात महसूलची जबाबदारी ((Shetkari Samman Yojana Work) कृषी विभागावर (Agriculture Department) टाकण्यात आली आहे. कृषी विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही.

काम वाढले, परंतु अतिरिक्त मनुष्यबळ नाही
सध्या शेतकरी सन्मान निधीच्या याद्या दुरूस्त करण्यासाठी (Shetkari Samman Yojana Work) कृषी विभागाकडे लॅपटॉप नाही. या परिस्थितीत संपूर्ण योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित झाली आहे. ही योजना हस्तांतरित करताना कृषी विभागाला रिक्त पदे भरली जातील असा शब्द देण्यात आला होता. प्रत्यक्षात अतिरिक्त्त मनुष्यबळ मिळाले नाही. उलट अतिरिक्त काम वाढले. यातून योजनेच्या कामावर बहिष्कार टाकला आहे.

सातबाराही आम्हाला द्या
महसूल विभागाने (Revenue Department) शेतकरी सन्मान ही शेतकर्‍यांची योजना आहे म्हणून काम (Shetkari Samman Yojana Work) कृषी विभागाकडे दिले. याचवेळी शेतकरी सातबारा (Satbara Work) स्वत:कडे ठेवला. यामुळे आम्हाला सातबाराही द्या, तो कृषीचा आहे. तुम्ही का ठेवला असा प्रश्न संघटनेने केला आहे.

कृषी विभागावर खापर
आधी ही योजना महसूल विभागाकडे होती. महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभाग अशा संयुक्त विद्यमाने त्याचे काम (Shetkari Samman Yojana Work) होत होते. शेतकर्‍यांच्या नावाचा डेटा महसूल यंत्रणेने डाऊनलोड केला आहे. ही योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर त्यात अनेक त्रुटी येत आहेत. याला कृषी विभागाला जबाबदार धरले जात आहे.
योजना हस्तांतरित होण्यापूर्वी तांत्रिक मनुष्यबळाचा विचार होणे अपेक्षित होते. पुढे अधिवेशनामध्ये कृषिमंत्र्यांनी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्याचा अध्यादेश निघेपर्यंत बहिष्कार (Boycott) कायम राहणार आहे असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.