वीज बिल वसुली थांबवा, विजपुरवठा सुरळीत करा; हिंगोलीत महावितरण कार्यालयासमोर शिवसेनेचं ठिय्या आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात महावितरण कडून वीज कपात केली जात असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. शेतकऱ्यांची वीजकपात तसेच इतर मागण्यांवरून हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी हिंगोली महावितरण कार्यालयासमोर शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली

काय आहेत आंदोलकांच्या मागण्या ?

–महावितरणच्या वतीनं जिल्ह्यात सध्या सक्तीनं वीज बिल वसुली सुरू आहे आहे. ही वसुली तत्काळ थांबवावी
— वीजपुरवठा सुरळीत करावा यासह अन्य मागण्यांसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं.
–यावेळी जिल्ह्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाला स्थिगिती देण्यात यावी.
शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा असा मागण्याही करण्यात आल्या.

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे आणि जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्यासह अनेक शिवसैनिकांसह मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या राज्य सरकारचा करायचं काय खाली डोक वर पाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच भाजपच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याचबरोबर जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष देखील यावेळी आंदोलकांनी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी या आंदोलनात शिवसैनिकांबरोबर मोठ्या संख्येनं शेतकरी देखील सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शिवसैनिक आणि शेतकऱ्यांचे आभार मानन्यात आले.

error: Content is protected !!