पापरिका मिरचीची करार पद्धतीने शेती; प्रति क्विंटल 27 ते 30 हजार भाव मिळतोय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात हल्ली शेतकरी पारंपरिक शेतीहून अधिक आधुनिक पद्धतीची शेती करत आहे. याचसह आता काही शेतकऱ्यांनी करार पद्धतीची शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. करार पद्धतीची शेती ही उत्पादनाच्या आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षित आहे. यामुळे करार पद्धतीची शेती परवडते. हिंगणगाव जिल्ह्यातील आसेगाव येथील दहा शेतकऱ्यांनी सुद्धा औषधी गुणधर्म असलेल्या पापरीका मिरचीचे करार पद्धतीने उत्पादन घेतले आहे.

हिंगोलीच्या मुरलीधर भालेराव यांनी अमेरिकेच्या औषध कंपनीशी करार केला आहे. मुरलीधर यांनी पापरीका मिरचीचे उत्पादन घ्यायचं ठरवलं आहे. मिरचीच्या प्रकारात ए ग्रेड आणि बी ग्रेड अशा दोन प्रकार मिरच्यांचे ठरवले आहेत. ज्या कंपनीशी करार केला आहे. ती कंपनी प्रतिक्विंटल २७ ते ३० हजार रुपये मिरचीची खरेदी केली आहे. तसेच औषधी गुणधर्म असलेल्या पापरिका मिरचीची लागवड केली आहे. तसेच याची प्रायोगिक स्वरुपात लागवड केली तरीही चांगलं उत्पादन मिळू शकतं.

शेतपिकांच्या बांधावर येऊन मिरच्यांची विक्री :

मुरलीधर यांनी पारंपरिक शेतीला कंटाळून कंपनीशी करार करून ३० गुंठ्यांत औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. या शेतीसाठी फारसा खर्च लागत नाही. म्हणून मुरलीधर यांनी केवळ ३० हजार रुपये खर्च करून यातून पाच हजार क्विंटलपर्यंत मिरचीची तोडणी सुरू असून त्यानंतर मिरच्या वाळवल्या जात आहेत. त्यानंतर या मिरच्यांची खरेदी करण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावर येऊन या मिरचीची खरेदी करतात.

मुरलीधर यांना १ लाख ४० हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. दरम्यान एकूण ३० गुंठयातून शेतकरी भालेराव हे तीस गुंठ्यांत एक लाखांचा नफा मिळवत आहेत, शेतकरी म्हणत आहेत. पापरीका मिरचीची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने गावातील अनेक शेतकऱ्यांनी या मिरचीची लागवड केली आहे.

error: Content is protected !!