Smart Trap For Banana Weevil: केळीवरील सोंडेकीड नियंत्रक स्मार्ट सापळ्यास मिळाले पेटंट; कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश!

0
5
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: केळी पिकांवरील सोंडेकीड नियंत्रणाच्या स्मार्ट सापळ्याच्या (Smart Trap For Banana Weevil) डिझाइनला भारत सरकारकडून (Indian Government) पेटंट (Patent) मिळाले आहे.

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या (College of Agriculture Kolhapur) विद्यार्थ्यांनी हा सापळा (Smart Trap For Banana Weevil) बनवलेला आहे. महाविद्यालयाचा विद्यार्थी शिवम मद्रेवार याने सहकारी मित्रांच्या सोबत महाविद्यालयाच्या उद्यानविद्या विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. रवींद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले.

सोंडेकिडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी (Weevil Integrated Control Measures) किडीच्या भुंग्याना आकर्षित करणाऱ्या कामगंध सापळ्यामध्ये (Pheromone Trap) खाद्यरूपी आमिष स्पंजाचा आणि महाविद्यालयात उत्पादित होत असलेल्या मेटाऱ्हायझीम या जैविक कीटकनाशकाचा वापर करीत हा सापळा (Smart Trap For Banana Weevil) तयार केला.

केळीवर सोंडकिडीचे प्रमाण वाढत चालले असून, ती भविष्यातील मोठी समस्या होण्याचे संकेत मिळत आहेत. या किडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी केल्यास रसायनांचे अवशेष फळामध्ये आढळून येते. रासायनिक औषधांचा मारा करणे हा निर्यातक्षम केळी (Exportable Banana) उत्पादनाच्या दृष्टीने चिंतेची बाब होती. यावर स्मार्ट सापळा (Smart Trap For Banana Weevil) हा चांगला उपाय आहे. या संशोधनामुळे सोंडेकिडीच्या नियंत्रणास मदत होणार आहे. व निर्यातक्षम केळीत सुद्धा रासायनिक कीटकनाशकाचे अवशेष आढळणार नाही.

कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी मद्रेवार याच्या पुढाकाराने संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या गटात संगीता धिन्वा, अपूर्वा श्रीष्टी, सिद्धाली शेगर, यश कांबळे, तुषार चव्हाण यांचा सहभाग आहे. पेटंट प्राप्त करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र कांबळे यांनी विशेष समारंभात अभिनंदन केले.