कुंपणच राखणार शेत…! वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान थांबवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कडून 50 कोटींची तरतूद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , राज्यातल्या अनेक भागांमध्ये वन्य प्राण्यांच्यामुळे शेतीची मोठी नास धूस होते. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आणखी त्रास सहन करावा लागतोआहे. त्यातही अशा घटनांच्या मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शेतकऱ्यांची हीच समस्याच लक्षात घेऊन महाविकास आघाडी सरकारने डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना राबवण्याचा निर्णय दि. २८ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत वन्यप्राण्यांमुळे शेती पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सौरउर्जा कुंपणाचा समावेश करण्यात येणार असून त्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावरील योजना यशस्वी

वन्यजीवांच्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होते. शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे संरक्षण करण्याकरिता रात्रीच्या वेळी देखील शेतावर संरक्षण करावं लागतं. पण वन्यजीवांचा हल्ल्याचा धोका देखील असतो. त्यावर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर वैयक्तिक सौर ऊर्जा कुंपण उभारण्याची योजना राबवण्यात आली. यातून या भागात गेल्या काही वर्षात पीक नुकसान कमी प्रमाणात झाल्याचे दिसून आले. तसेच सौर ऊर्जा कुंपण हटवता येण्यासारखे असल्याने वन्य प्राण्यांचे ब्राह्मण मार्गदेखील मुक्त राहतात ही बाब महत्त्वाची आहे.

किती मिळेल अनुदान ?

— वरील सर्व गोष्टी लक्षात घेऊन या योजनेची व्याप्ती वाढवून त्याअंतर्गत अशा संवेदनशील गावांमध्ये शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण उभारण्याकरिता अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
— या योजनेच्या अंतर्गत प्रती लाभार्थी सौरऊर्जा कुंपणाच्या किमतीच्या 75 टक्के किंवा पंधरा हजार रुपये यापैकी जी कमी असेल त्या रकमेएवढे अनुदान देण्यात येईल.
— सौर ऊर्जा साहित्याच्या किमती च्या अनुषंगाने उर्वरित 25 टक्के किंवा अधिक रकमेचा वाटा लाभार्थ्यांना राहील.
— यात ग्राम परिस्थिती विकास समिति किंवा संयुक्त वनव्यवस्थापन समिती शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर लाभार्थी उर्वरित 25 टक्के यांचा वाटा समितीकडे जमा करेल.
— अशा संवेदनशील गावांची निवड तसेच सौर ऊर्जा कुंपण साहित्याचे मापदंड निर्धारित करणे आणि गुणवत्ता नियंत्रण करणे हे प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्या अध्यक्षतेखालील समित्या करतील.

50 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

2022 – 2023 मध्ये डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतील शंभर कोटी पैकी 50 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सौरऊर्जा कुंपण करिता करण्यात येईल. या योजनेच्या अंमलबजावणी बाबत सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर हे जाहीर करतील तसंच लाभार्थ्यांना या योजनेची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी माहिती व्यवस्थापन प्रणालीचा वापर करण्यात येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!