solar panel : शेतीत सोलर पॅनेलचे आहे खूप महत्त्व, जाणून घ्या काय आहेत फायदे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

solar panel : आपल्या देशातील शेतकरी शेतीसाठी अनियमित मान्सून आणि अपुऱ्या वीज यंत्रणेवर अवलंबून आहेत. या आव्हानांमुळे शेतकऱ्यांची पीक उत्पादन क्षमता कमी आहे. कधी पाण्यामुळे तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कायमच घट होत असते. भारतीय शेतकर्‍यांकडे देशातील उष्णकटिबंधीय हवामानाच्या रूपात मौल्यवान सौर संपत्ती आहे, जी शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात सौर पॅनेल बसवून ऊर्जा आणि पाण्याच्या गरजा पूर्ण करण्याची संधी देते. याचा शेतकऱ्यांना देखील मोठा कायदा होतो. सध्या देशात सौरऊर्जा पॅनेलला खूप मागणी आहे आणि भारत सरकार यासाठी अनुदान देखील देत आहे.

भारतातील ग्रामीण भागात अनेकदा विजेचा तुटवडा असतो किंवा ती योग्य वेळी पुरविली जात नाही. अशा परिस्थितीत, शेतात सौर पॅनेल बसवून, शेतकरी स्वतःची वीज तयार करू शकतात, ज्याचा वापर सिंचन, यंत्रसामग्री आणि इतर शेतीसाठी करता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो आणि उत्पन्नात देखील वाढ होते.

सोलर पॅनलसाठी या ठिकाणाहून करा अर्ज

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये सोलर पॅनल बसवायचे असेल तर लगेच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही सोलर पॅनल साठी अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर यामध्ये पात्रता काय आहे? आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? त्याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

सिंचन सुलभता

शेताची करायची म्हंटल की त्यासाठी पहिलं पाणी हे लागचतच. शेतीत खतं नसतील तर चालू शकत मात्र आणि हे लागतच त्यामुळे सौर ऊर्जेमुळे पिकांना सिंचन करण्यासाठी विहिरी आणि इतर जलस्रोतांमधून पाणी उपसण्यास मदत होते. सौरऊर्जेवर चालणारे पंप दिवसा मुबलक सूर्यप्रकाश वापरून काम करू शकतात, ज्यामुळे वनस्पतींची पाण्याची गरज भागू शकते.

पैशाची बचत होते

सौर पॅनेलची किंमत सामान्य विजेपेक्षा कमी आहे. एकदा सोलर पॅनेल बसवल्यानंतर, त्यांचे संचालन आणि देखभाल खर्च तुलनेने कमी असतो, ज्यामुळे शेतकरी इतर आवश्यक गरजांसाठी पैसे वाचवू शकतात. शेतीशिवाय सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत मिळू शकतो. शेतकरी अतिरिक्त वीज निर्माण करू शकतात आणि नेट मीटरिंगद्वारे ग्रीडला परत विकू शकतात, ज्यामुळे त्यांना त्यामधून देखील पैसे मिळतील.

error: Content is protected !!