Sugarcane Price: सोमेश्वर कारखान्याने दिला शेतकऱ्यांना विक्रमी दर; जाणून घ्या किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: गाळप हंगाम 2023-2024 साठी सर्वोत्कृष्ट दर (Sugarcane Price) देणारा कारखाना म्हणून श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने (Someshwar Cooperative Sugar Factory) मोठा विक्रम (Record Sugarcane Rate) केला आहे.

संपूर्ण राज्यात एफआरपीपेक्षा (FRP) प्रति मेट्रीक टन  ऊसाला 697 रुपये जास्त दर (Sugarcane Price) सोमेश्वर कारखान्याने दिला आहे. त्यामुळे अनुदानासह शेतकऱ्यांच्या (Farmers) उसाला प्रति टन दर हा 3771 रुपये दर जाहीर केलाय.

मागील 2023-2024 गाळप हंगामासाठी सर्वोत्कृष्ट दर (Sugarcane Price) देणारा हा राज्यातील पहिला कारखाना (Sugar Factory) ठरला आहे.

एफआरपीपेक्षा तब्बल 697 रुपये जास्त 

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2023-2024 साठी उसाला प्रति टन अनुदानासह 3771 रुपये दर (Sugarcane Price) जाहीर केलाय. एफआरपीपेक्षा तब्बल 697 रुपये जास्त दर देण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिलीय. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कारखान्यावर असणारे लक्ष व त्यांचे वेळोवेळीचे मार्गदर्शन, संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण यामुळे सोमेश्वर सर्वोच्च ऊस दराची (Sugarcane Price) परंपरा कायम राखू शकला, अशी माहिती जगताप यांनी दिलीय. 

5 लाख 23 हजार 876 मेट्रिक टन ऊसाचे गाळप 

कारखान्याने गत हंगामासाठी 3571 रुपये उच्चांकी ऊस दर (Sugarcane Price) जाहीर केला आहे. सभासद व बिगर सभासदांच्या जानेवारीमध्ये तुटणाऱ्या उसास 75 रुपये, फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या उसास 100 रुपये, मार्चमध्ये तुटणाऱ्या उसास 150 रुपये व नंतर हंगाम संपेपर्यंत तुटणाऱ्या उसास 200 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. अनुदानासह जानेवारीमध्ये तुटलेल्या उसास 3646 रुपये, फेब्रुवारीमधील उसाला 3671 रुपये, मार्चसाठी 3721 रुपये दिला गेला आहे. तर मार्चनंतर तुटलेल्या ऊसाला 3771 रुपये दर जाहीर केलाय. गत हंगामात सोमेश्वरने एकूण 15 लाख 23 हजार 876 मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, बी हेवीसह सरासरी 12.21 टक्के साखर उतारा राखत 18 लाख 26 हजार 500 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. गत हंगामाची एफआरपी 2 हजार 873 रुपये होती. त्यापैकी आजवर 3 हजार 100 रुपये दिले आहेत. पुढील महिन्यामध्ये 100 ऊस प्रोत्साहन अनुदान हे सभासदांच्या खात्यावर वर्ग केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

आमचा अंतिम दर हा मेरीटवर ठरतो  : पुरुषोत्तम जगताप 

मागील हंगामात ऊसाची कमतरता होती. या काळात देखील 15 लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. आमच्या कारखान्याची रिकव्हरी ही 12.21 आहे. कारखान्यावर डिस्टलरी प्रोजक्ट, को जनरेशन आहे. तसेच साखर विक्रीला देखील चांगला दर मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर देणे शक्य झाल्याचे सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले. आम्ही इतर कोणत्याही साखर कारखान्यांशी स्पर्धा करत नाही. आमचा अंतिम दर (Sugarcane Price) हा मेरीटवर ठरतो असेही जगताप म्हणाले.

error: Content is protected !!