Sonalika Tractors : नोव्हेंबरमध्ये सोनालिका ट्रॅक्टर विक्रीत 23 टक्क्यांनी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोनालीका या आघाडीच्या ट्रॅक्टर निर्माता कंपनीने (Sonalika Tractors) नोव्हेंबर महिन्यात 12 हजार 891 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. जी मागील वर्षी या महिन्यात झालेल्या 10 हजार 464 ट्रॅक्टरच्या विक्रीपेक्षा 23 टक्क्यांनी (Sonalika Tractors) अधिक आहे. याशिवाय कंपनीने यावर्षी आतापर्यंत वर्षभरात 1 लाख ट्रॅक्टर विक्रीचा आकडा पार केला आहे. त्यामुळे आता मागील सात वर्षांपासून दरवर्षी एक लाख ट्रॅक्टर विक्री करण्याची कंपनीची परंपरा कायम राहिली आहे.

सोनालीका ट्रॅक्टर्स कंपनीचे (Sonalika Tractors) व्यवस्थापकीय संचालक रमन मित्तल यांनी म्हटले आहे की, ट्रॅक्टर उद्योगामधील इतर कंपन्यांच्या तुलनेत चालू महिन्यात सोनालीका ट्रॅक्टरची भागीदारी ही 16.3 टक्के इतकी राहिली असून, या महिनाभरात ट्रॅक्टर विक्रीमध्ये कंपनीने मोठी मजल मारली आहे. यावर्षी कंपनीने नोव्हेंबर महिन्यातच आपला 1 लाख ट्रॅक्टरविक्रीचा आकडा पार केला आहे. जो मागील सात वर्षांपासून कायम ठेवण्यात कंपनीला यश आले आहे. नोव्हेंबर महिन्यात कंपनीने 12 हजार 891 ट्रॅक्टर विक्री केले आहे. जे मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत 23 टक्क्यांनी अधिक आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात कंपनीने 10 हजार 464 ट्रॅक्टरची विक्री केली होती. देशातील 15 लाख शेतकरी कंपनीसोबत जोडलेले असून, कंपनीचे हे यश शेतकऱ्यांच्या भरवश्यामुळेच शक्य झाले आहे.

अन्य ट्रॅक्टरच्या विक्रीतील वाढ (Sonalika Tractors sale In November)

दरम्यान उपलब्ध आकडेवारीनुसार सोनालीका ट्रॅक्टरव्यतिरिक्त महिंद्रा या कंपनीने नोव्हेंबर महिन्यात 31 हजार 069 ट्रॅक्टर विक्री केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात महिंद्रा ट्रॅक्टरच्या विक्रीत 6 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. एस्कॉर्ट्स कंपनीने नोव्हेंबर महिन्यात आपल्या ट्रॅक्टरच्या विक्रीत 6.74 टक्के वाढ नोंदवली आहे. याशिवाय अन्य एका टैफ (ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट्स) ग्रुपच्या ट्रॅक्टर विक्रीमध्ये ७.०६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

error: Content is protected !!