हॅलो कृषी ऑनलाईन: भारतामध्ये शेळ्यांच्या अनेक जातींमध्ये सोनपरी शेळीची (Sonpari Goat) जात खूप लोकप्रिय आहे. या जातीच्या (Goat Breed) शेळीपालनातून (Goat Farming) शेतकर्यांना चांगला आर्थिक नफा मिळवता येतो. जाणून घेऊ या शेळीची (Sonpari Goat) वैशिष्ट्ये.
सोनपरी शेळीची वैशिष्ट्ये (Sonpari Goat Features)
- सोनपरी शेळी ही बेरारी शेळी (Berari Goat) आणि ब्लॅक बंगाल (Black Bengal Goat) या दोन शेळीच्या संकराने तयार झाली आहे.
- या शेळीची खास गोष्ट म्हणजे या शेळीची कातडी चमकदार असल्यामुळे ही सोन्यासारखी दिसते त्यामुळे तिला सोनपरी असे म्हणतात.
- ही शेळी प्रामुख्याने मांसासाठी (Goat For Meat Production) पाळली जाते. त्याच्या मांसाला बाजारात चांगली मागणी आहे.
शरीर रचना
सोनपरी जातीच्या शेळीचा (Sonpari Goat) रंग तपकिरी किंवा काळा असतो. त्याच्या मागच्या बाजूला डोक्यापासून शेपटीपर्यंत एक काळी रेष असते ज्यामुळे ती अधिक उठून दिसते. त्याच्या मानेवर एक काळे वर्तुळ असते. शेपटी मागे वक्र झालेली असते. कान पानाच्या आकाराचे असून खालच्या दिशेने वाकलेले असतात. शिंग चपटे असून बाहेरच्या बाजूस पसरलेले असतात. या शेळीचे वजन साधारणपणे 35 ते 40 किलो असते.
ही शेळी दरवर्षी 3 ते 4 पिलांना जन्म देते. त्यामुळे लहान पशुपालक अल्पावधीत या शेळीचे पालन करून लाखो रुपये सहज कमवू शकतात.
सोनपरी शेळीची किंमत किती आहे? (Sonpari Goat Breed Price)
सोनपरी शेळीच्या (Sonpari Goat) मांसाला बाजारात चांगली मागणी असल्याने त्याची किंमतही बाजारात चांगली आहे. इतर शेळ्यांच्या तुलनेत सोनपरी बोकडाची बाजारातील किंमत 22 ते 25 हजार रूपयांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत या शेळीचे पालनपोषण करून चांगले उत्पन्न मिळू शकते.
सोनपरी शेळीची देखभाल
सोनपरी शेळीच्या देखभालीसाठी विशेष व्यवस्था करावी लागत नाही. घराच्या एका कोपर्यातही बांधून ठेवू शकता. ही शेळीही झाडाची पाने खाऊन जगते. याशिवाय फळे, भाज्या, हिरवे गवत इत्यादी खाते. सोनपरी शेळी उष्ण व कोरड्या हवामानात सहज राहू शकते.