हॅलो कृषी ऑनलाईन: भारतासारख्या कृषिप्रधान देशात विविध धान्य (Sorghum Value Added Products) पिकवली जातात. मात्र अनेकदा या शेतमालाला अपेक्षित भाव (Market Rate) न मिळाल्यामुळे शेतकरी (Farmer) हवालदिल होतो. अशा वेळी शेतमालाचे मूल्यवर्धन करून विक्री केल्यास शेतकऱ्यांना त्यातून चांगले उत्पन्न मिळवता येते.
ज्वारी (Sorghum Millet) या धान्यापासून विविध पौष्टिक उपपदार्थ (Sorghum Sub-Products) तयार करता येतात. सध्या या पदार्थांना बाजारात खूप मागणी आहे. असे पदार्थ तयार करून म्हणजेच ज्वारीचे मूल्यवर्धन (Sorghum Value Added Products) करून शेतकऱ्यांना अधिकचा नफा (Profit) मिळवता येईल.
ज्वारी ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक धान्य आहे, ज्यामध्ये प्रथिने, तंतू, जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. अलीकडे ज्वारीला मागणी वाढल्याने त्याचे मूल्यवर्धन (Sorghum Value Added Products) करून विक्री करणे निश्चितच फायद्याचे आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया ज्वारीचे मूल्यवर्धित पापड (Jowar Papad) आणि त्याचे पोषणमूल्य.
ज्वारीच्या पापडाचे व ज्वारीचे पोषणमूल्य (Sorghum Nutritional Value)
कॅलरीज: 100 ग्रॅम ज्वारीमध्ये साधारणतः 349 कॅलरीज असतात.
प्रथिने: 100 ग्रॅम ज्वारीमध्ये साधारणतः 10.6 ग्रॅम प्रथिने असतात.
चरबी: 100 ग्रॅम ज्वारीमध्ये साधारणतः 1.9 ग्रॅम चरबी असते, ज्यामध्ये संतृप्त चरबीची मात्रा खूप कमी असते.
कार्बोहायड्रेट्स: 100 ग्रॅम ज्वारीमध्ये साधारणतः 72.6 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात.
तंतू: 100 ग्रॅम ज्वारीमध्ये साधारणतः 6.7 ग्रॅम तंतू असतात, जे पचनासाठी अत्यंत उपयुक्त असतात.
खनिजे व विटामिन
100 ग्रॅम ज्वारीमध्ये साधारणतः 25 मिलिग्रॅम कॅल्शियम, 4.1 मिलिग्रॅम लोह, 165 मिलिग्रॅम मॅग्नेशियम, 287 मिलिग्रॅम फॉस्फरस, 377 मिलिग्रॅम पोटॅशियम, 0.33 मिलिग्रॅम विटामिन बी1, 2.1 मिलिग्रॅम विटामिन बी3 असते.
ज्वारीचे पापड (Sorghum Value Added Products)
ज्वारीचे पापड करण्यासाठी लागणारे साहित्य: ज्वारीचे पीठ – 2 कप, जिरे – 1 चमचा, मीठ – चवीनुसार, तिखट – 1 चमचा, हिंग – 1/2 चमचा, पाणी – आवश्यकतेनुसार
ज्वारीचे पापड करण्याची कृती
- ज्वारीचे पीठ एका भांड्यात घ्या.
- त्यात जिरे, मीठ, तिखट आणि हिंग घाला.
- थोडे-थोडे पाणी घालून पीठ मळा. पीठ मऊ आणि एकसंध होईल असे मळा.
- पीठ मळल्यानंतर त्याचे लहान-लहान गोळे तयार करा.
- प्रत्येक गोळ्याला लाटून पातळ पापड तयार करा.
- तयार पापड एका स्वच्छ कपड्यावर ठेवा आणि उन्हात वाळवा.
- पापड चांगले वाळल्यानंतर ते एका हवाबंद डब्यात साठवा.
ज्वारीच्या पापडांना तळून किंवा भाजून खाण्यासाठी वापरता येते. ते चटणी, सॉस किंवा कोणत्याही भाजीबरोबर खाल्ल्यास स्वादिष्ट लागतात.
अशा प्रकारे ज्वारीचे पापड (Sorghum Value Added Products) तयार करून ज्वारी शेतमालाचे मूल्यवर्धन केल्यास शेतकर्यांना नक्कीच आर्थिक हातभार मिळू शकतो. आकर्षक पॅकिंगसह बाजारात याची सहज विक्री करता येते.