Soyabean : काढणी, मळणी, साठवण ‘अशी’ कराल तरच रहाल फायद्यात; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन लागवड (Soyabean Cultivation) करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबरोबरच देशातील सोयाबीनचे उत्पादनही मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. असे असले तरी प्रत्यक्षात मात्र सोयाबीनची उत्पादकता कमी झाल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. म्हणजे पूर्वी एकरी जितका सोयाबीन निघायचा त्याप्रमाणात आता कमी निघत आहे. Soyabean Rate Today

शेतकरी मित्रांनो आता सरकारी योजना मिळवण्यासाठी तुम्हाला कुठेही चकरा मारण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या सरकारी योजनेची माहिती मिळवून स्वतःच मोबाईलवरून Apply करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

सोयाबीनचे अयोग्य नियोजन अन काढणी, मळणी, साठवण तंत्र यातील चुका सोयाबीनची उत्पादकता कमी होण्यास कारणीभूत आहे. अनेकदा सोयाबीन काढण्यास शेतकऱ्यांना उशीर होतो अन परिणामी त्याचा सोयाबीन उत्पदादानावर परिणाम होऊन उत्पादन घटते. आज आपण सोयाबीनच्या काढणी, मळणी अन साठवण तंत्राबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

Table of Contents

काढणी

सोयाबीन (Soyabean) पीक पेरणीनंतर साधारणतः ९५ ते १०५ दिवसांत काढणीसाठी (Harvesting) तयार होते. पीक परिपक्व झाल्यानंतर पिकाची काढणी लवकर करणे फार महत्त्वाचे आहे. योग्य वेळी काढणी न केल्यास शेंगा तडकून उत्पादनात १५ ते २० टक्के घट येते.

पीक परिपक्व झाल्यानंतर ८५ ते ९० टक्के पाने देठासहित गळून पडतात. शेंगांचा रंग पिवळा ते काळसर होऊ लागतो. सोयाबीनचे उत्पादन आणि प्रत चांगली राखण्यासाठी पावसाचा अंदाज घेऊन पिकाची काढणी करावी. कारण, बियाणाला पक्वतेनंतर किचिंत ओलावा लागला तरी बियाण्याची उगवणक्षमता कमी होते.

बियाण्यातील ओलावा १४ ते १५ टक्के असताना कापणीला सुरवात करावी. वेळेवर कापणी केल्यास मळणीमध्ये बियांचे नुकसान होत नाही.

पिकाची काढणी धारदार कोयत्याने जमिनीलगत कापून करावी. झाडे उपटून येणार नाहीत याची काळजी घ्यावी. काढणीनंतर सोयाबीनचे एकत्र ढीग किंवा गंजी करून ठेवू नये. यामुळे त्यास बुरशी लागून धान्याची प्रत खालावते.

काढणी केलेले पीक उन्हामध्ये चांगले वाळवावे. मळणीसाठी उशीर होणार असेल तरच वाळलेल्या सोयाबीनची गंजी करून ठेवता येईल.

मळणी

मळणी यंत्राने मळणी करताना बियाण्यातील आर्द्रता १४ टक्के पेक्षा कमी नसावी. मळणी यंत्राच्या फेऱ्याची गती प्रति मिनीट ४०० ते ५०० फेरे इतकी ठेवावी.

बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के पर्यंत असेल तर मळणी यंत्राच्या फेऱ्याची गती ३०० ते ४०० फेरे प्रति मिनीट ठेवावी.

मळणीवेळी अधूनमधून बियाण्यावर लक्ष ठेवावे. जेणेकरून त्याची डाळ होणार नाही. डाळ होण्याचे प्रमाण जास्त असल्यास वेग कमी करावा.

साठवण (Storage Facility)

मळणीनंतर बियाणांची योग्य ठिकाणी साठवण करणे गरजेचे आहे. योग्य रीतीने साठवण न केल्यास उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होतो.

साठवण करण्यापूर्वी बियाणे २ ते ३ दिवस उन्हामध्ये चांगले वाळवावे.

साठवण करतेवेळी बियाण्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ टक्के पेक्षा जास्त असू नये.

शक्यतो साठवणुकीसाठी पत्र्याच्या कणगीची वापर करावा.

पोत्यामध्ये साठवण केल्यास, पोते जमिनीवर सरळ उभे न ठेवता फळीवर ठेवावे. प्रत्येक पोते ८० किलोपर्यंत भरलेले असावे. पोती एकावर एक रचताना ४ पेक्षा पोते एकावर एक ठेवू नयेत.

error: Content is protected !!