Soyabean : सोयाबीन पिकात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालाय? वाढ कमी अन पाने वाळल्यासारखी दिसतायत? हे उपाय करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी सल्ला (Soyabean Market) : सोयाबीन पेरणी होऊन ३०-४५ दिवस होत आहेत, काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी अतिशय कमी पाऊस आहे, अशा परिस्थितीत सोयाबीन पिकाची पाहिजेत तशी वाढ झालेली दिसत नाही. बरेच ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे, सोयाबीन पिवळे होऊन पूर्ण पणे वाळून जात आहे. या वर्षी या किडीचा प्रादुर्भाव जास्त का आहे आणि सोयाबीन पिकामध्ये इतका मोठा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे हे एक आव्हान सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी असणार आहे.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

ज्या भागात चांगला पाऊस झाला नाही तिथे या किडीचा प्रादुर्भाव जास्त

या वर्षी पेरणी उशिरा झाली त्यातच पाऊस कमी झाला आहे ( बरेच ठिकाणी) काही ठिकाणी जास्त प्रमाणात आहे, परंतु ज्या भागात चांगला पाऊस झाला नाही तिथे या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे, त्याच बरोबर जे शेत हलके ( म्हणजे कमी उत्पदकताअसलेली/ तेथील जमिनीची पोत खालावली आहे तिथे ). आतापर्यंत जमिनीत चांगला ओलावा येईल, पाणी भरेल असा भरपूर पाऊस कुठेच झालेला दिसत नाही हे एक त्यामागचे कारण आहे.

पाऊस झाला की येणारे भुंगे नष्ट करणे आवश्यक

या किडीचा प्रादुर्भाव झाला की त्याचे प्रादुर्भाव दिसतात परंतु त्याचे नियंत्रण करणे खूप मोठा प्रश्न आहे आणि तेही सोयाबीन पिकामध्ये तर अजून कठीण आहे , यासाठी preventive measures खूप महत्त्वाच्या असतात जसे की उन्हाळ्यात पहिला पाऊस झाला की लिंबाचे किंवा इतर झाडे असतील त्यावर येणारे भुंगे नष्ट करणे आवश्यक असते परंतू आपण ते करत नाही आणि आता आपले पीक वळायला लागले की आपल्याला लगेच नियत्रंण हवे असते.

पीक पिवळे पाडण्याचे कारण काय?

कमी पाऊस असल्या कारणाने किंवा जमिनीत ओलावा कमी असल्याने जमिनीतील अन्नद्रव्ये किंवा सेंद्रिय पदार्थ सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, किंवा जमिनीची पोत खालावली असेल तर सेंद्रिय पदार्थ कमी प्रमाणात असतात. त्यामुळे या किडीला खाण्यासाठी ते उपलब्ध होत नाही त्यामुळे ही किडी वरती येऊन आपल्या शेतातील पिकाचे मुळे खाते व त्यानंतर आपल्याला आपले पीक पिवळे पडलेले दिसते व ते वाढत जाऊन वाळते.

सोयाबीनवरील कीड व्यवस्थापन कसे करावे?

1) याचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जैविक पद्धतीचा अवलंब preventive म्हणून करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण Metarhizium annisopliae ( मेटारायझियम) याचा वापर करू शकता परंतु याचा वापर करताना आपल्याला प्रादुर्भाव झाला की लगेच करणे आवश्यक आहे किंवा प्रादुर्भाव होण्याच्या पहिले करणे आवश्यक आहे.

2) २ किलो किंवा लिटर प्रति एकर पाण्यात मिसळून आळवणी करणे किंवा २ किलो / लिटर गांडूळ खताचे सोबत मिसळून सर्व शेतात टाकता येऊ शकते. हे करत असताना आपल्याला शेतात ओल असणे आवश्यक आहे, जर पाऊस कमी असेल तर पाणी देऊन मग याचा वापर करावा.

3) ही एक जैविक बुरशी असल्याने, हुमणी नाशक असल्याने त्याची quality / गुणवत्ता खुप महत्वाची असते त्यामुळे वापरताना योग्य सल्ला घेऊन व चांगल्या प्रतीचे वापरावे तरच आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतील.

4) रासायनिक कीटक नाशक वापरणे ही शेवटची पायरी आहे, जर आपल्याला रासायनिकच वापर करायचा असेल तर त्यासाठी
@ Thiamethoxam 0.9% + Fipronil 0.2% GR ४-५ किलो प्रति एकर, किंवा Chlorantraniliprole – 0.4% GR २-३ किलो किंवा Clothianidin 50% Wdg ५०-१०० gm १०० लिटर पाण्यात मिसळून एकरी Drenching करू शकता.

5) हे रासायनिक granular ( दाणेदार) कीटक नाशक सोयाबीन पिकासाठी वापरायचे असेल तर त्यासाठी आपण ५-१० किलो खत ( डीएपी किंवा १०:२६:२६ ) यांचे सोबत मिसळून प्रादुर्भाव झाला असेल त्या शेतात एक समान टाकू शकता. कारण Drenching करणे सोयाबीन पिकात तरी शक्य नाही ( माझ्यामते )

6) खऱ्या अर्थाने रासायनिक कीटनाशकांचा वापर करत असताना त्याचे पूर्णपणे रिझल्ट मिळतील असे नाही. त्यामुळे जैविक पद्धतीचा अवलंब करणे फायदेशीर ठरते परंतु प्रादुर्भाव होण्याच्या आधीच आपले नियोजन करणे आवश्यक आहे जेणेकरून आपले पीक हातातून जाणार नाही.

प्रादुर्भाव दिसताच कोळप्याची पाळी देऊन वरील प्रमाणे कीटक नाशक वापरले आणि योग्य पाणी व्यवस्थापन केले तर नियत्रंण मिळवता येवू शकते. वरील कीटनाशकांचा वापर केल्यास हूमणी किडी बरोबरच, चक्री भुंगा तसेच खोड माशी या किडींचे नियंत्रण सुध्दा होईल. साद्याच्या परिस्थितीत अनेक ठिकाणी हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे त्या शेतकरी मित्रांनी वरील प्रमाणे योग्य नियोजन करावे.

Dr Anant Ingle
Director Vidarbha Agriculture Development Foundation Chikhli, Buldhana

error: Content is protected !!