Soyabean Market : एप्रिल ते जून महिन्यात सोयाबीनच्या संभाव्य किंमती काय राहतील? शासकीय अहवाल काय म्हणतोय पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean Market)। सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे तेलबिया पिक आहे. अमेरिका, ब्राझील, आर्जेन्टिना, चीन व भारत या देशात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. या प्रमुख देशातून जागतिक उत्पादनाच्या सुमारे ९० टक्के सोयाबीनचे उत्पादन होते. त्यामुळे या देशातील सोयाबीनची मागणी, पुरवठा व उपभोग या घटकामध्ये होणाऱ्या बदलाचा सोयाबीनच्या किमतीवर परिणाम होत असतो.

अमेरिकन कृषी विभागाच्या, (WASDE, मार्च- २०२३) अहवालानुसार सन २०२२-२३ मध्ये, जगात सोयाबीनचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत ८ टक्केनी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच भारतात व महाराष्ट्रात सोयाबीनचे उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. (कृषि मंत्रालय, भारत सरकार)

मागील तीन महिन्याच्या कालावधीत (जानेवारी ते मार्च २०२३) या दरम्यान लातूर बाजारातील सोयाबीनच्या किमतींत घसरता कल दिसून येतो. जानेवारी २०२३ मध्ये सोयाबिनच्या सरासरी किमती रु. ५३९२ प्रती क़्वि. होत्या. त्यामध्ये घट होऊन माहे मार्च २०२३ मध्ये रु. ५१५७ प्रती क्वि. पर्यंत कमी झाल्या आहेत.

असा चेक करा तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये बाजारभावासोबत सातबारा, जमीन मोजणी, भूनकाशा, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक शेतीसंबंधिक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बना.

सन २०२२-२३ या खरीप हंगामासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किमत (MSP) रु.४३०० प्रती क्विंटल आहे. मागील तीन महिन्यातील लातूर बाजारातील सोयाबीनच्या किंमती व भारतातील APMC बाजारातील आवक खालील तक्त्यात दर्शिवल्या आहेत. सोयाबीनच्या किंमती व आवक मध्ये घट होत आहे.

मागील काही वर्षातील किमतीचे अर्थमिती विश्लेषण व बाजारातील सद्यस्थिती विचारात घेता, पुढील तीन महिन्याच्या कालावधीत लातूर बाजारात सोयाबीनच्या सरासरी संभाव्य किमती ४ हजार ८०० रुपये ते ५ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!