हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन (Soyabean Market) हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे तेलबिया पिक आहे. अमेरिका, ब्राझील, आर्जेन्टिना, चीन व भारत या देशात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. या प्रमुख देशातून जागतिक उत्पादनाच्या सुमारे ९० टक्के सोयाबीनचे उत्पादन होते. त्यामुळे या देशातील सोयाबीनची मागणी, पुरवठा व उपभोग या घटकामध्ये होणाऱ्या बदलाचा सोयाबीनच्या किमतीवर परिणाम होत असतो. नुकत्याच जाहीर झालेल्या संभाव्य किमतींनुसार सोयाबीनचे बाजारभाव पुढील दोन महिन्यांत (एप्रिल – मे) वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अमेरिकन कृषी विभागाच्या, (WASDE, जानेवारी- २०२३) अहवालानुसार सन २०२२-२३ मध्ये, जगात ३८८ दशलक्ष टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत ८ टक्केनी (३५८ दशलक्ष टन, २०२१-२२) अधिक आहे. भारतात सन २०२२-२३ मध्ये सोयाबीनचे उत्पादन १२ दशलक्ष टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. मागील वर्षी (२०२१-२२) मध्ये ११.९० दशलक्ष टन उत्पादन झाले आहे.
महाराष्ट्र शासन, कृषी विभागाच्या, प्रथम अंदाज अहवालानुसार, महाराष्ट्रात खरीप हंगाम २०२२- २३ मध्ये, सोयाबीनचे उत्पादन ६.५८ दशलक्ष टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. मागील वर्षी (२०२१-२२) ५.४ दशलक्ष टन उत्पादन झाले होते.
सन २०२२-२३ या खरीप हंगामासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किमत (MSP) रु.४३०० प्रती क़्कि. आहे. मागील तीन महिन्यातील इंदूर बाजारातील सोयाबीनच्या किंमती व भारतातील APMC बाजारातील आवक पुढील प्रमाणे-

मागील तीन महिन्याच्या कालावधीत (डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३) या दरम्यान लातूर बाजारातील सोयाबीनच्या किमतींत घसरता कल दिसून येतो. नोव्हेंबर २०२२ मध्ये सोयाबिनच्या सरासरी किमती रु. ५३५४ प्रती क्वि. वरून डिसेंबर २०२२ मध्ये रु. ५२९८ प्रती क्वि. झाल्या व जानेवारी २०२३ मध्ये रु. ५३९२ प्रती क्वि. होत्या.
तुमच्या जवळच्या बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव कसा चेक करायचा?
शेतकरी मित्रांनो आता आपल्या गावाच्या जवळच्या बाजारसमितीमधील रोजचा ताजा बाजारभाव चेक करणे सोपे झाले आहार. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi नावाचे मोबाईल अँप तुम्हाला डाउनलोड करून घ्यावे लागेल. इथे रोजचा ताजा बाजारभाव तर मिळतोच पण त्यासोबतच सातबारा, जमिनीचा नकाशा, हवामान अंदाज, जमीन मोजणी, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री या सुविधाही उपलब्ध होतात. तेव्हा आजच Hello Krushi अँप तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करून घ्या.
मागील काही वर्षातील किमतीचे अर्थमिती विश्लेषण व बाजारातील सद्यस्थिती विचारात घेता, माहे मार्च २०२३ या कालावधीत लातूर बाजारात सोयाबीनच्या संभाव्य किमती रु. ५१०० ते ५७०० प्रती क्रिकटल या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन महिन्याच्या कालावधीत (एप्रिल – मे २०२३) सोयबीनच्या किमतीतीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.