Soyabean Rate Today :आजचे सोयाबीन बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सोयाबीनचा दरामध्ये सतत चढ-उतार होताना दिसत आहे. सोयाबीनच्या घरामध्ये सतत चढ- उतार होत असताना दिसून येत आहे. मागच्या दोन आठवड्यांपूर्वी सोयाबीनच्या दरामध्ये कमालीची घसरण झाली होती आणि हे दर सात हजारांवर येऊन ठेपले होते. या आठवड्याची सुरुवात चांगली झाली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोयाबीनला कमाल भाव 7550 इतका मिळाला तर आजही चांगला भाव सोयाबीन ला मिळाला आहे आज दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठ हजार पाचशे रुपयांचा कमाल भाव सोयाबीन ला मिळाला आहे.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. आज बाराशे क्विंटल सोयाबीनचे दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक झाली. याकरिता किमान भाव 5400 तर सर्वसाधारण भाव 6800 आणि कमाल भाव आठ हजार पाचशे रुपये इतका मिळाला. त्याखालोखाल चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कमाल सात हजार 455 रुपयांचा भाव मिळाला तर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत सात हजार तीनशे रुपयांचा कमाल भाव मिळाला. गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार शंभर रुपयांचा कमाल भाव सोयाबीन मिळाला तर अकोला आणि लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल सात हजार रुपयांचा दर सोयाबीनला मिळाला आहे. आज सोयाबीनचे सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही आवक चार हजार 596 क्विंटल इतकी आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/05/2022
औरंगाबादक्विंटल40600065546277
माजलगावक्विंटल568550066216400
सिल्लोडक्विंटल137630065006400
तुळजापूरक्विंटल155640066006500
सोलापूरलोकलक्विंटल96570067756680
अमरावतीलोकलक्विंटल4395645067106580
अमळनेरलोकलक्विंटल15520056005600
कोपरगावलोकलक्विंटल282600069216735
मेहकरलोकलक्विंटल670640069756600
लातूरपिवळाक्विंटल4596645070006860
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल100670068116750
जालनापिवळाक्विंटल2629550073006600
अकोलापिवळाक्विंटल1587555070006300
यवतमाळपिवळाक्विंटल614620067506475
चिखलीपिवळाक्विंटल850630074556878
बीडपिवळाक्विंटल137600067506397
पैठणपिवळाक्विंटल14587662856226
भोकरपिवळाक्विंटल58601167016356
मलकापूरपिवळाक्विंटल177572566906275
शेवगावपिवळाक्विंटल25600060006000
गेवराईपिवळाक्विंटल93550065556350
गंगाखेडपिवळाक्विंटल30670071006800
दर्यापूरपिवळाक्विंटल1200540085006800
देउळगाव राजापिवळाक्विंटल19500064006000
धरणगावपिवळाक्विंटल11529560005295
नांदगावपिवळाक्विंटल12603065506301
गंगापूरपिवळाक्विंटल37455062705967
आंबेजोबाईपिवळाक्विंटल120620069366800
किल्ले धारुरपिवळाक्विंटल15530065856001
उमरगापिवळाक्विंटल6650065006500
आष्टी-जालनापिवळाक्विंटल20630064216350
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल100640066006500
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल107600065006250
देवणीपिवळाक्विंटल37650068556677

Leave a Comment

error: Content is protected !!