Soyabean Rate Today: सोयाबीन उत्पादकांना चांगल्या दराची प्रतीक्षाच; पहा आज किती मिळाला भाव ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेला राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन (Soyabean Rate Today) बाजार भाव नुसार आज सोयाबीनला कमाल 6,291 रुपयांचा भाव मिळाला आहे हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज बाजार समितीमध्ये 21,584 क्विंटल सोयाबीनची आवक झाली याकरिता किमान भाव 5151 सर्वसाधारण भाव 5 600, तर कमाल भाव 6,291 रुपये इतका मिळाला आहे.

त्या खालोखाल वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील सहा हजार रुपयांचा कमाल भाव (Soyabean Rate Today) मिळालेला आहे मात्र इतर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील बाजार भाव पाहता हे 5500 रुपये पर्यंत आहेत.

रब्बी हंगाम सुरू झाला असला तरी देखील खरिपातल्या सोयाबीनला (Soyabean Rate Today) म्हणावा तसा दर यंदाच्या वर्षी मिळताना दिसत नाहीये त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. शिवाय मध्यंतरी झालेल्या परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन देखील अपेक्षेप्रमाणे झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी आशा आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव (Soyabean Rate Today)

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
26/11/2022
औरंगाबाद क्विंटल 48 5001 5501 5251
माजलगाव क्विंटल 832 4411 5461 5300
राहूरी -वांबोरी क्विंटल 41 5300 5500 5400
उदगीर क्विंटल 4400 5500 5541 5520
सेलु क्विंटल 67 4600 5441 5070
तुळजापूर क्विंटल 215 5300 5500 5400
राहता क्विंटल 107 5000 5500 5450
धुळे हायब्रीड क्विंटल 14 4800 5555 5325
सोलापूर लोकल क्विंटल 281 4600 5495 5305
अमरावती लोकल क्विंटल 6057 5200 5407 5303
नागपूर लोकल क्विंटल 1258 4400 5442 5182
हिंगोली लोकल क्विंटल 1850 5050 5695 5372
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 55 4600 5371 5000
वडूज पांढरा क्विंटल 150 5000 6000 5500
लातूर पिवळा क्विंटल 21584 5151 6291 5600
अकोला पिवळा क्विंटल 5108 4500 5460 5300
चिखली पिवळा क्विंटल 1933 4851 5601 5226
बीड पिवळा क्विंटल 140 4660 5500 5292
वाशीम पिवळा क्विंटल 6000 4750 5600 5200
भोकरदन पिवळा क्विंटल 32 5300 5500 5400
भोकर पिवळा क्विंटल 404 4049 5459 4759
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 649 5000 5400 5200
मलकापूर पिवळा क्विंटल 500 4400 5450 5230
सावनेर पिवळा क्विंटल 51 5200 5461 5400
गेवराई पिवळा क्विंटल 83 4175 5399 4800
गंगाखेड पिवळा क्विंटल 33 5600 5700 5600
तेल्हारा पिवळा क्विंटल 550 5175 5460 5350
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 50 4000 5400 5000
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 547 5450 5500 5475
किनवट पिवळा क्विंटल 66 5000 5300 5200
उमरगा पिवळा क्विंटल 34 4750 5550 5300
बार्शी – टाकळी पिवळा क्विंटल 525 5100 5700 5350
आष्टी-जालना पिवळा क्विंटल 45 5160 5460 5350
पांढरकवडा पिवळा क्विंटल 48 5370 5400 5390
उमरखेड पिवळा क्विंटल 140 5000 5200 5100
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 70 5000 5200 5100
error: Content is protected !!