Soyabean Rate Today :आजचे सोयाबीन बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागच्या आठवड्यापासून सोयाबीनच्या भावात कमालीची चढ-उतार होत आहे. सोयाबीनचे दर हे कमाल सात हजार रुपयांवर आले होते. मात्र आजचे बाजार भाव पाहता त्यात काहीशी सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीनला कमाल भाव 7500 रुपये मिळाला आहे. हा भाव जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत 2115 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 6300,कमाल भाव 7500 आणि सर्वसाधारण भाव 6 हजार 600 रुपये दर मिळाला आहे. त्याखालोखाल चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल सात हजार 374 रुपयांचा भाव आज सोयाबीनला मिळाला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन ला कमाल 7040 रुपयांचा भाव मिळाला. तर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल सात हजार रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण भाव हे सात हजार रुपयांच्या आतच असल्याचं पाहायला मिळत आहे. मागच्या आठवड्यापासून सोयाबीनच्या कमाल आणि सर्वसाधारण दरातही घट होत असताना पाहायला मिळत आहे मात्र आजचे दर वाढलेले दिसत आहेत.

राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. लवकरच मान्सूनचे आगमन राज्यामध्ये होईल, त्यामुळे खरिपाच्या तयारीला आता शेतकरी लागला आहे. सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांना चांगला भाव मिळत असल्यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांच्या लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 20-5-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/05/2022
जळगावक्विंटल23570064006300
औरंगाबादक्विंटल13500065615780
माजलगावक्विंटल290540065006351
उदगीरक्विंटल1220690069756937
कारंजाक्विंटल3500655569806845
तुळजापूरक्विंटल120650067006600
अमरावतीलोकलक्विंटल3033635067506550
नागपूरलोकलक्विंटल464570068026527
हिंगोलीलोकलक्विंटल190640068306615
कोपरगावलोकलक्विंटल128500067536622
मेहकरलोकलक्विंटल490640068006600
परांडानं. १क्विंटल1645064506450
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल73550068916841
जालनापिवळाक्विंटल2115630075006600
अकोलापिवळाक्विंटल1186600070406500
यवतमाळपिवळाक्विंटल300610068606480
चिखलीपिवळाक्विंटल593630073746837
बीडपिवळाक्विंटल7630165006434
वाशीमपिवळाक्विंटल2100645070006800
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल60650068506700
पैठणपिवळाक्विंटल11591065006300
भोकरपिवळाक्विंटल5500060015500
जिंतूरपिवळाक्विंटल9667067256670
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल21540062505900
गेवराईपिवळाक्विंटल132550066216400
परतूरपिवळाक्विंटल50625166806675
किल्ले धारुरपिवळाक्विंटल136510067006500
केजपिवळाक्विंटल85550068006700
मुरुमपिवळाक्विंटल12655165516551
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल81600066006300

Leave a Comment

error: Content is protected !!