हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही काळापासून सोयाबीनचे भाव (Soybean Bajar Bhav) हे 5 हजारच्या खालीच रेंगाळले आहेत. आज ना उद्या सोयाबीनचे भाव वाढतील, या उद्देशाने बहुतांश शेतकर्यांनी यंदा सोयाबीन घरातच ठेवले; परंतु भाव (Soybean Bajar Bhav) अजूनही वाढलेले नाहीत.
दरम्यान, आता खरीप हंगामात (Kharif Season) पेरणीसाठी पैशांची अडचण निर्माण झाल्यामुळे भाव पाच हजाराच्या आसपास असला तरी नाइलाज म्हणून शेतकर्यांनी ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी काढले आहेत. यामुळे बाजार समितीत (Bajar Samiti) आवक वाढली आहे. सध्या बाजारात सोयाबीनला 4800 ते 5000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव (Soybean Bajar Bhav) मिळत आहे.
जिल्ह्यात यावर्षी जूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला. यामुळे खरीपाची पेरणी (Kharif Sowing) वेळेवर झाली. काही मोठ्या शेतकर्यांची वेळेवर वाफसा न झाल्यामुळे अद्यापही पेरणी सुरू आहे. तर काही ठिकाणी मोठा पाऊस पडून शेतात पाणी थांबल्यामुळे दुबार पेरणी करावी लागत आहे.
एकीकडे पेरणी, तर दुसरीकडे पिकांची आंतरमशागत (Intercultural Operations) अशी स्थिती सध्या दिसत आहे. शेतकरी फवारणी, खते शेतामध्ये टाकण्यात व्यस्त आहेत. गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीन पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. कडधान्याचे दर मात्र वाढल्यामुळे शेतकर्यांना त्याचा फायदा होणार आहे.
काय आहेत सध्या वेगवेगळ्या धान्याचे बाजारभाव? (Soybean Bajar Bhav)
धान्य – (प्रति क्विंटल)
गहू – 3500 ते 4000
ज्वारी – 4100 ते 4800
मका – 2200 ते 2250
तूर – 9750 ते 10,500
हरभरा – 6600 ते 7000
मूग – 9200 ते 9800
उडीद – 9000 ते 9500