Soybean Market Price : आज सोयाबीनला मिळाला 7800 रुपयांचा कमाल भाव ; पहा आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला (Soybean Market Price) सर्वाधिक 7800 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

हा भाव वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये केवळ 15 क्विंटल पांढऱ्या सोयाबीनची आवक झाली याकरिता किमान भाव 7400 कमाल भाव 7800 आणि सर्वसाधारण भाव सात हजार 450 रुपये इतका मिळाला.

मात्र राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे (Soybean Market Price) बाजार भाव पाहिले असता हे बाजार भाव 5000 च्या दरम्यान आहेत. आज उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5400 रुपयांचा कमाल भाव मिळालाय, मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5,036, आंबेजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5111, धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5100, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5000 रुपयांचा कमाल भाव मिळालाय. गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5200, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5270 रुपये तर नावाजलेल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5325 रुपयांचा कमाल भाव आज सोयाबीनला मिळाला आहे

तर आज सर्वाधिक आवक लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Soybean Market Price) इथेच झाली असून ही अवक 3746 क्विंटल इतकी झाली असून याकरिता किमान भाव 4500 कमाल भाव 5325 आणि सर्वसाधारण भाव 5100 रुपये इतका राहिला.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
01/10/2022
जळगाव क्विंटल 59 3750 4300 4300
उदगीर क्विंटल 540 5100 5209 5154
कारंजा क्विंटल 200 4000 4950 4520
सेलु क्विंटल 9 4750 5000 5000
तुळजापूर क्विंटल 75 4700 4900 4800
सोलापूर लोकल क्विंटल 373 4280 5050 4850
नागपूर लोकल क्विंटल 482 4300 5254 5016
हिंगोली लोकल क्विंटल 300 4600 5000 4800
कोपरगाव लोकल क्विंटल 153 4100 5040 4971
वडूज पांढरा क्विंटल 15 7400 7800 7450
लातूर पिवळा क्विंटल 3746 4500 5325 5100
जालना पिवळा क्विंटल 605 3000 4930 4850
अकोला पिवळा क्विंटल 447 4300 5100 4900
चिखली पिवळा क्विंटल 120 4351 4851 4601
वाशीम पिवळा क्विंटल 1500 4550 5270 5000
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 150 4450 5100 4800
पैठण पिवळा क्विंटल 600 1100 2000 1600
भोकरदन पिवळा क्विंटल 7 5100 5200 5150
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 145 4200 4800 4500
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 500 4750 5145 4975
मलकापूर पिवळा क्विंटल 141 4331 5065 4700
सावनेर पिवळा क्विंटल 1 3800 3800 3800
गेवराई पिवळा क्विंटल 31 4451 4551 4500
परतूर पिवळा क्विंटल 10 4426 4740 4576
गंगाखेड पिवळा क्विंटल 11 5100 5200 5100
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 25 4100 4300 4300
वरोरा पिवळा क्विंटल 29 4000 5000 4250
धरणगाव पिवळा क्विंटल 147 4560 5100 4875
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 75 4301 5111 5000
मुरुम पिवळा क्विंटल 160 4700 5036 4868
उमरगा पिवळा क्विंटल 7 4200 4850 4700
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 100 5200 5400 5300
सिंदी(सेलू) पिवळा क्विंटल 135 4250 4740 4625
error: Content is protected !!