Soybean Market Price : सोयाबीनच्या दरात घट; पहा आज किती मिळाला सोयाबीनला भाव ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसांपूर्वी सोयाबिनला (Soybean Market Price) कमाल ६-७ हजार रुपयांचा दर मिळत होता. मात्र आता सोयाबीन दराची स्थिती ढासळली आहे. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील सोयाबीन बाजारभावानुसार सोयाबीनचे कमाल दर ४५०० पर्यंत येऊन ठेपले आहेत.

आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला (Soybean Market Price) सर्वाधिक कमाल भाव 5425 इतका भाव मिळाला आहे. आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3340 क्विंटल पिवळ्या सोयाबीन आवक झाली. याकरिता किमान भाव 5000, कमाल भाव ५४२५ आणि सर्वसाधारण भाव 5380 रुपये मिळाला आहे.

याखेरीज इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5000 च्या दरम्यान कमाल भाव सोयाबीनला (Soybean Market Price) मिळतो आहे. तर औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4500 कमाल, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल 4500, भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल 4814, दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4700 रुपये असे भाव प्रतिक्विंटल साठी मिळाले आहेत.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
19/09/2022
औरंगाबाद क्विंटल 12 4200 4500 4350
माजलगाव क्विंटल 216 4600 5075 4900
तुळजापूर क्विंटल 85 5000 5100 5050
सोलापूर लोकल क्विंटल 4 4500 4500 4500
नागपूर लोकल क्विंटल 244 4400 5275 5056
हिंगोली लोकल क्विंटल 219 4600 5093 4846
ताडकळस नं. १ क्विंटल 66 4951 5251 5100
लातूर पिवळा क्विंटल 3340 5000 5425 5380
अकोला पिवळा क्विंटल 362 4400 5395 5065
यवतमाळ पिवळा क्विंटल 156 4800 5255 5012
चिखली पिवळा क्विंटल 92 4800 5190 4995
भोकर पिवळा क्विंटल 4 4704 4814 4759
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 102 4900 5100 5000
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 790 5125 5380 5225
मलकापूर पिवळा क्विंटल 90 4355 5170 4600
दिग्रस पिवळा क्विंटल 4 4700 4700 4700
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 1 5253 5253 5253
औसा पिवळा क्विंटल 236 4701 5369 5185
चाकूर पिवळा क्विंटल 20 4799 5200 5101
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 50 5190 5277 5233
मुरुम पिवळा क्विंटल 65 4890 5090 4990
उमरगा पिवळा क्विंटल 2 5120 5120 5120
उमरखेड पिवळा क्विंटल 120 5200 5400 5300
काटोल पिवळा क्विंटल 15 5175 5175 5175
सोनपेठ पिवळा क्विंटल 12 4500 5055 4900
error: Content is protected !!