Soybean Market Price : राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीन भावात काय झाला बदल ? जाणून घ्या बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कमी वेळेत चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनला (Soybean Market Price) पसंती दिली आहे. शिवाय मागच्या दोन-तीन वर्षांपासून सोयाबीनला चांगला दर मिळतो आहे त्यामुळे सोयाबीन लागवडीकडे यंदाच्या खरिपात देखील शेतकऱ्यांचा कल राहिला.

मागच्या काही दिवसांपूर्वी सोयाबीनचे (Soybean Market Price) दर हे कमाल सहा ते सात हजार रुपयांच्या दरम्यान होते. मात्र सध्याचे बाजार भाव पाहता सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे. राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचा दर हा 5000 रुपयांच्या दरम्यान आहे. तर काही ठिकाणी मात्र सोयाबीनच्या कमाल दरात घसरण झाली असून काही बाजार समित्यांमध्ये हे दर चार हजार रुपयांच्या पटीत आले आहेत.

आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समिती यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाव मिळाला आहे हा भाव रुपये प्रतिक्विंटल कमाल ५३५० असा आहे.

आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4987 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची अवक झाली. याकरिता किमान भाव 4728 कमाल भाव ५३५० आणि सर्वसाधारण भाव 5270 रुपये इतका मिळाला आहे.

तर आज सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार (Soybean Market Price) समिती इथेच झाली असून ही अवक चार हजार 987 क्विंटल इतकी झाली आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
20/09/2022
सिल्लोड क्विंटल 2 5100 5100 5100
परळी-वैजनाथ क्विंटल 160 4951 5122 5051
कन्न्ड क्विंटल 2 4100 4500 4400
सोलापूर लोकल क्विंटल 21 4700 4895 4850
हिंगोली लोकल क्विंटल 205 4500 5105 4802
लातूर पिवळा क्विंटल 4987 4728 5350 5270
जालना पिवळा क्विंटल 286 4800 5050 5000
अकोला पिवळा क्विंटल 612 4105 5285 5055
हिंगणघाट पिवळा क्विंटल 2502 4500 5300 4870
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 350 4400 5125 4950
केज पिवळा क्विंटल 40 4851 5000 4951
मुरुम पिवळा क्विंटल 58 3940 4985 4462
काटोल पिवळा क्विंटल 86 3750 5071 4550
error: Content is protected !!