हॅलो कृषी ऑनलाईन: बरेचसे शेतकरी सोयाबीनची पट्टा (Soybean Pattaper Sowing Method) पद्धतीने पेरणी करून भरघोस उत्पन्न मिळवत असतात. मग आता ही ‘पट्टा’ पद्धतीने पेरणी कशी केली जाते? आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेऊ या.
खरीपात सोयाबीन (Kharif Soybean) पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. परंतु अनेक वेळा सोयाबीनचे उत्पादन (Soybean Production) हे कमी प्रमाणात मिळत असते. आणि त्यातून होणारा आर्थिक तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे राज्यातील बरेचसे शेतकरी हे सोयाबीनची पट्टा पद्धतीने (Soybean Pattaper Sowing Method) पेरणी करून भरघोस उत्पन्न मिळवत असतात.
पट्टा पेरणी पद्धतीचे फायदे (Benefits Of Pattaper Sowing Method)
- पट्टा पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे कमी प्रमाणात लागते. (प्रति एकर 22 किलो बियाणे लागते.) तसेच बियाणे खर्चात देखील बचत होते. (आठ किलो बियाण्याचा खर्च वाचतो)
- पट्टा पद्धतीने पेरणी (Soybean Pattaper Sowing Method) केल्यास शेतात मोकळी जागा निर्माण होते. त्यामुळे पिकावर पडणाऱ्या किडी, अळ्या व रोग यांचे निरीक्षण व नियंत्रण योग्य रित्या करता येते.
- अळ्यांचा प्रादुर्भाव कमी होतो. अळ्या एका पट्ट्यातून दुसऱ्या पट्ट्यात जाण्यासाठी नालीचा अडथळा असल्यामुळे त्यांचा प्रादुर्भाव कमीच राहतो.
- शेतात हवा खेळती राहते त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
- पिकाला थेट जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश मिळतो, त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होते.
- ओलित व्यवस्थापन करणे शक्य होते. म्हणजे ओलिताची सोय असल्यास सरींच्या माध्यमातून पाटपाणी अथवा स्प्रिंकलरची सोय असल्यास सरीचा उपयोग स्प्रिंकलर पाइप टाकण्यासाठी होतो.
- बॉर्डर इफेक्ट मिळतो. जसे की गादी वाफ्यावरील काठावरच्या दोन्ही ओळींना मुबलक हवा, अन्नद्रव्ये, पाणी व सूर्यप्रकाश मिळतो. या ओळीतील झाडांना पसरण्यासाठी मोकळी जागा मिळाल्यामुळे शेंगा जास्त प्रमाणात लागतात, यामुळे उत्पादनात वाढ होते.
- पिकात साचलेल्या पावसाच्या पाण्याचे मूलस्थानी संवर्धन होते. डवरणी पश्चात् शेतात पडणारे पावसाचे पाणी सरीमध्ये साचते, मुरते व जिरते. त्यामुळे साहजिकच सोयाबीनच्या शेंगेमधील शेवटचा दाणा पक्व होईपर्यंत जमिनीतील ओल टिकून राहते. उत्पादनात मोठी वाढ होण्यास मदत मिळते.
पट्टा पेरणी कशी करावी? (Soybean Pattaper Sowing Method)
पट्टा पद्धतीने सोयाबीनची पेरणी करताना प्रत्येक चौथी ओळ खाली ठेवावी लागते. म्हणजेच 25 टक्के ओळींची संख्या कमी होते. त्यामुळे 25 टक्के झाडांची संख्या कमी होते. अशा प्रकारे प्रचलित पद्धतीने लागवड करताना राखल्या जाणाऱ्या 1,77,777 एवढ्या झाडांच्या संख्येऐवजी 1,33,333 एवढी संख्या पट्टा पद्धतीत ठेवली जाते. त्यामुळे झाडांची संख्या कमी जरी झाली तरीही पट्टा पद्धतीच्या (Soybean Pattaper Sowing Method) लागवडीतून उत्पादनात चांगली वाढ होत असते.