संत्र्यावर कोळी किडीचा प्रादुर्भाव, कसे कराल व्यवस्थापन ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी जिल्ह्यातील संत्रा फळपिकावर रसशोषण करणाऱ्या कोळी या किडीच्या प्रादुर्भावात वाढ होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे फळांचा आकार, दर्जावर परिणाम होत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

परभणी जिल्ह्य़ात परभणी, मानवत, पूर्णा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा लागवड आहे. काळवीट वसंत ऋतूचा प्रादुर्भाव, संत्र्यावर कोळी किडी मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. जालना, औरंगाबाद जिल्ह्यात मोसंबीवार या मोठ्या क्षेत्रामध्येही कोळी किडचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. इतर जिल्ह्यांमध्येच मोसंबीचा प्रादुर्भाव फळबागांमध्ये वाढू शकतो. संत्रा, मोसंबी या लिंबूवर्गीय फळपिकांवर कोळी किडीच्या प्रादुर्भावात वाढ दिसून येत आहे. कोळी किडीचा प्रादुर्भाव वर्षभर आढळून येतो. परंतु ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान जास्त असतो. या किडीमुळे फळांचे नुकसान होऊन विकृत फळे तयार होतात. ही कीड पाने तसेच फळांची साल खरवडते. रसशोषण करते.

काय होतो परिणाम ?

— पानावर पांढूरके चट्टे पडतात.
–फळावर तपकिरी लालसर किंवा जांभळट रंगाचे चट्टे पडतात. याला शेतकरी ‘लाल्या’ म्हणून ओळखतात.
— जास्त प्रादुर्भाव असल्यास फळातील फोडींची वाढ व्यवस्थित होत नाही.
–फळांची प्रत खालावते. त्यामुळे व्यापारी फळे खरेदी करत नाहीत.

कसे करावे व्यवस्थापन ?

–या किडीच्या व्यवस्थापनासाठी वेळोवेळी बागेची निरीक्षणे करून वेळीच उपाय करावेत. पाण्याचा ताण पडू देऊ नये.
–निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.
–रासायनिक नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी डायकोफॉल (१८.५ ईसी) २.७ मि. लि. किंवा डायफेनथीयूरोन (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
–आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी, असे आवाहन कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. एस. नेहरकर, डॉ. अनंत लाड, डॉ. योगेश मात्रे, डॉ. राजरतन खंदारे यांनी केले.

स्रोत : ऍग्रोवन

error: Content is protected !!