पावसाळ्यात जनावरांना स्पायडर लिलीच्या विषबाधेचा धोका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो अशा अनेक वनस्पती आहेत ज्यांच्या सेवनामुळे जनावरांना विषबाधा होते. विशेषतः पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असल्यामुळे मोकळ्या जागेत जनावरांना चरण्यासाठी सोडले जाते. मात्र विषारी वनस्पती खाल्ल्या जातात. आजच्या लेखात आपण अशाच एका विषारी वनस्पती बाबत आजच्या लेखात जाणून घेऊया…

लिली वनस्पती अंब्राईलीडायसी कुटुंबातील आहे. या वनस्पतीची उंची ६० ते ७० सेंटिमीटर असून त्याचा कांदा ७ ते १० सेंटिमीटर रुंद असतो. वयानुसार कांद्याला मान येते. ती साधारण चार ते पाच सेंटिमीटर रुंद असते. लिली वनस्पतीच्या विविध प्रजातीपैकी, स्पायडर लिली या वनस्पतीचे फूल मोठे पांढरे व सुगंधी असते.

मेंढ्यांमधील विषबाधा

काही दिवसांपूर्वी ब्रह्मपुरी (जि. परभणी) या ठिकाणी १० ते १५ मेंढयांमध्ये स्पायडर लिली या वनस्पतीची विषबाधा आढळून आल्याची शक्यता दिसून आली आहे. जे पशुपालक मेंढी सोबत होते, त्यांच्यानुसार ही विषबाधा लिली या वनस्पतीचे सेवन केल्यामुळे असू शकतो असा अंदाज आहे. विषबाधा झालेल्या मेंढयामध्ये पोटफुगी, खाद्य न खाणे, अस्वस्थपणा वाटने, संडास व लघवी न येणे अशा प्रकारची लक्षणे आढळून आली.

तीन दिवसांमध्ये १५ मेंढ्यांचा मृत्यू दिसून आहे. लिली वनस्पतीची विषबाधा जरी मांजरांमध्ये नोंद असली तरी पहिल्यांदा मेंढयांमध्ये या वनस्पतीची बाधा व मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनावरांना ज्या ठिकाणी लिलीची वनस्पती आहे, त्या भागात चरण्यास पाठवू नये.

लिली या वनस्पतीच्या विविध प्रजाती आहेत. स्पायडर लिलीचा कांदा सर्वात जास्त विषारी मानला जातो. अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे, की लिली वनस्पती ही मांजर व श्‍वानांमध्ये जास्त घातक असते.

१) लिली वनस्पती मांजराने सेवन केली आणि योग्य वेळी उपचार झाले नाही तर तीन दिवसांच्या आत मांजराच्या किडनीवर घातक परिणाम होतो.

२) सुरुवातीच्या बारा तासांच्या आत उलटी येणे, मळमळणे, हगवण लागणे आणि शरीरातील पाणी कमी होणे ही लक्षणे दिसतात. त्यानंतरच्या १२ ते २४ तासात सतत लघवी, हगवण लागते. शरीरातील पाणी कमी ही लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात. उपचारास १८ तासांपेक्षा जास्त विलंब झाल्यास पुढील २४ ते ७२ तासात किडनी निकामी होते. प्राणी दगावण्याची शक्यता वाढते.

Leave a Comment

error: Content is protected !!