Square And Boll Shedding: कापूस पिकात पातेगळ आणि बोंडगळ समस्या उद्भवत आहे का? असे करा व्यवस्थापन!    

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: कापूस पिकात (Square And Boll Shedding) आपत्कालीन परिस्थितीत वेगवेगळ्या कारणांमुळे पातेगळ आणि बोंडगळ सारख्या समस्या उद्भवतात. या समस्येचे विविध कारणे आणि त्यावरील व्यवस्थापन उपाय जाणून घेऊ या.

पातेगळ आणि बोंडगळ होण्याची कारणे (Causes Of Square And Boll Shedding)

कापूस पिकात (Cotton Crop) खालीलप्रमाणे वेगवेगळ्या कारणामुळे पातेगळ आणि बोंडगळ (Square And Boll Shedding) दिसून येते.

  • जास्त किंवा कमी झालेला पाऊस पातेगळ आणि बोंडगळ (Square And Boll Shedding)होण्यास कारणीभूत ठरते, तसेच तापमानातील अचानक झालेला चढउतार हे सुद्धा महत्वाचे कारण आहे.
  • कापूस पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पोषक घटकांसाठी होणारी स्पर्धा
  • कापूस पिकात होणारा किडींचा प्रादुर्भाव
  • शेतात पाणी साचून राहणे किंवा जमिनीतील ओलावा कमी होणे
  • सूर्यप्रकाशासाठी होणारी पिकांची स्पर्धा

पातेगळ आणि बोंडगळ समस्येवर उपाय (Management Of Square And Boll Shedding In Cotton)

  • आकस्मिक परिस्थितीत कापूस पिकात पुरेसे अन्न आणि पाणी व्यवस्थापन करावे.
  • पिकात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.
  • नॅफ्थाइल ऍसिटिक ऍसिड (NAA) 20 पीपीएम याप्रमाणात फवारणी करावी.
  • पिकाचे वाढ नियंत्रण करून शेंडा खुडणी करावी.  
  • पोटॅशियम नायट्रेटची 1 टक्के याप्रमाणात फवारणी करावी.
  • पिकामध्ये भरपूर हवा व सूर्यप्रकाश मिळावा म्हणून व्यवस्थापन करावे.
  • पिकातील 20 ते 30 टक्के बोंडे फुटल्यानंतर पहिली वेचणी करून घ्यावी त्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या अंतराने दुसरी आणि तिसरी वेचणी करावी.
  • कापूस वेचणी आटोपल्यानंतर सर्व पऱ्हाट्या उपटून शेताबाहेत न्यावे व त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापर करावा, जेणेकरून त्यात दडलेल्या किडींच्या अवस्था नष्ट होतील.  

error: Content is protected !!