State Goverment : राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 210 कोटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

State Goverment : महाराष्ट्र राज्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पहिल्यांदाच 125 वर्षामध्ये जे घडलं नव्हतं ते यंदा घडल आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास 21 दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड राहिला आहे. त्याचबरोबर सध्या राज्यभर पाऊस गायब झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. शेतकऱ्यांची पिके सुकू लागली असून काही ठिकाणी पीके करपली असल्याचे पाहायला मिळत आहे.

संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग कायम आहे. जर आगामी काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडला नाही तर खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याचबरोबर फक्त खरीप हंगामच नाही तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील मोठा उपस्थित होणार आहे. यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यामध्येच आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (State Goverment)

राज्य सरकारने गेल्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या 1500 कोटी रुपयांपैकी 200 कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले असल्याची माहिती मिळत आहे. काल 28 ऑगस्ट 2023 रोजी शासनाच्या मदतीवर पुनर्वसन विभागाने मंजूर झालेल्या १५०० कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात 210 कोटी 30 लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला आहे. जवळपास हा निधी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असा आशावाद व्यक्त केला जातोय. हा निधी मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात काल वर्ग झाला आहे. त्याचबरोबर आता पुढील निधी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या शुक्रवार पर्यंत अजून अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 178 कोटी 25 लाख रुपयांचा निधी जमा केला जाणार आहे याबाबत मंत्री अनिल पाटील यांनी माहिती दिली आहे.

शेतकऱ्यांनी लवकरात लवकर इ-केवायसी करून घ्यावी

यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर अतिवृष्टीग्रस्त मदतीचा लाभ घ्यायचा असेल तर ज्या शेतकऱ्यांनी इ-केवायसी केलेले आहे त्यांच्याच खात्यात मदतीचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी इ-केवायसी अजूनही केलेले नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी असे आव्हान देखील करण्यात येत आहे.

error: Content is protected !!