Friday, September 29, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Stevia Farming : ‘हि’ औषधी वनस्पती 1 एकरात देते 10 लाख उत्पन्न; जाणून घ्या आयुर्वेदिक उपयोग अन मार्केटबाबत…

Radhika Pawar by Radhika Pawar
February 20, 2023
in आयुर्वेदिक, पीक माहिती, पीक व्यवस्थापन, बातम्या
Stevia Farming
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन । शेती करत असताना शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करणे गरजेचे आहे. पारंपरिक पिकांबरोबरच काही वेगळ्या पद्धतीचे शेतीसुद्धा प्रायोगिक तत्वावर करून पहिली तर नक्कीच अधिक नफा शेतीतून कमावता येऊ शकतो. सध्या औषधी वनस्पतींच्या लागवडीतून शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न कमावल्याचे आपण बातम्यांमध्ये ऐकले आहे. आज आम्ही अशाच स्टीव्हियाच्या शेतीबाबत (stevia farming) तुम्हला माहिती देणार आहोत. एकरी १० लाख कमावण्याची संधी स्टीव्हिया लागवडीतून असून त्याचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत.

शेतीमध्ये कोणताही नवीन प्रयोग करण्याआधी आपण त्याबाबत सविस्तर माहिती घेऊन त्याची चाचणी करणे खूप गरजेचे आहे. अनेकदा आपण कुठेतरी वाचून काही करायला जातो आणि वेळेवर शेतमालाला मार्केट न मिळाल्यास मोठे नुकसान होते. त्यामुळे कोणताही नवीन प्रयोग शेतीत करताना तो प्रथम प्रायोगिक तत्वावर काही मर्यादित क्षेत्रात करून पाहायला हवा. त्यात जर फायदा झाला आणि आर्थिक गणित जुळून आले तरच नंतर त्याची अंबलबजावणी करायला हवी. आम्ही आज सांगत असलेल्या स्टीव्हिया लागवडीबाबतही तुम्ही जरूर विचार करा.

Table of Contents

  • उसातून एकरी १०० टन ऊस काढायचाय?
  • स्टीव्हिया वनस्पती नक्की काय आहे? (stevia farming)
  • 5 वर्षांसाठी नफा मिळवा
  • 1 एकरातून 10 लाख उत्पन्न
  • स्टीव्हिया वनस्पतीचे औषधी गुणधर्म कोणते?

उसातून एकरी १०० टन ऊस काढायचाय?

शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकरी Hello Krushi मोबाईल अँपच्या मदतीने प्रयोगशील शेती करून आपले उत्पन्न दुप्पट करत आहेत. शेतातील नवनवीन प्रयोग, कृषी विद्यापीठांनी शोधलेल्या नवीन वाणांची योग्य माहिती, ते लागवडीपासून काढणीपर्यंत सर्व माहिती अन मार्केटला शेतमाल विकण्याची थेट सोया यामुळे Hello Krushi मोबाईल अँप अल्पावधीतच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. तुम्हीसुद्धा आजच गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi नावाचे मोबाईल अँप आजच डाउनलोड करून घ्या. इथे १ रुपयाही न भरता शेतकऱयांना शेतीविषयक माहिती, रोपांची खरेदी करण्याची सुविधा तसेच प्रक्रिया उद्योग उभारण्याचे मार्गदर्शन मोफतमध्ये केले जाते. यासोबत सातबारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्र डाउनलोड करता येतात. रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज शेतकरी या अँपच्या मदतीने स्वतः चेक करू शकतो. तेव्हा आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून या सेवेचे लाभार्थी .

Download Hello Krushi App

स्टीव्हिया वनस्पती नक्की काय आहे? (stevia farming)

स्टीव्हिया हि औषधी वनस्पतींपैकी एक आहे. स्टीव्हियाच्या पानांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. तसेच यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. यासोबतच कॅल्शियम, झिंक, लोह, फॉस्फरस, कॉपर, मॅंगनीज सारखे घटक देखील स्टीव्हियाच्या पानांमध्ये असल्याने सध्या त्याची मागणी वाढली आहे. अनेक रोगांवर स्टीव्हियाची पाने औषध म्हणून वापरली जातात. स्टीव्हियाच्या पानांमध्ये स्टीव्हियोसाइड्स आणि इल्कोसाइड्स म्हणून ओळखले जाणारे गोड पदार्थ असतात. या व्यतिरिक्त, त्यांच्यामध्ये आणखी 6 घटक आहेत ज्यात इन्सुलिन संतुलित करण्याचे गुणधर्म आहे. त्याची गोडी टेबल शुगरपेक्षा 250 पट जास्त आणि सुक्रोजपेक्षा 300 पट जास्त आहे.

5 वर्षांसाठी नफा मिळवा

स्टीव्हियाची लागवड रोपे कापून किंवा बियाणे पद्धतीने करता येते. स्टीव्हियाची लागवड वर्षातून दोनदा करता येते. सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि फेब्रुवारी ते मार्च दरम्यानचा कालावधी स्टीव्हिया लागवडीसाठी योग्य समजला जातो. लागवडीसाठी प्रथम बियाण्यांपासून रोपे तयार केली जातात. नंतर रोपे शेतात लावली जातात. स्टीव्हिया पिकाला उन्हाळ्यात दर आठवड्याला सिंचनाची गरज असते. तर थंडीमध्ये साधारण 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे लागते. एकदा लागवड केल्यास हे पीक पाच वर्षे सतत नफा देऊ शकते. stevia farming

1 एकरातून 10 लाख उत्पन्न

स्टीव्हिया ही एक औषधी वनस्पती आहे. सामान्यतः अनेक रोगांसाठी स्टीव्हियाच्या पानांचा वापर केला जातो. एका एकरात सुमारे 40,000 स्टेव्हिया रोपे लावता येतात. एकरी स्टीव्हिया लागवडीकरीता जवळपास एक लाख रुपये खर्च येतो. एका एकरात 40 हजार स्टेव्हियाची रोपे लावल्यास 25 ते 30 क्विंटल सुक्या पानांचे उत्पादन मिळते. बाजारात स्टीव्हियाची किंमत 250 ते 500 रुपये प्रति किलोपर्यंत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी एका एकरात 8 ते 10 लाख रुपयांचा नफा नक्कीच मिळवू शकतो.

स्टीव्हिया वनस्पतीचे औषधी गुणधर्म कोणते?

मधुमेहाच्या रुग्णासाठी फायदेशीर – स्टीवियामध्ये मधुमेह-विरोधी गुणधर्म आहेत. यासोबतच यात क्षती बीटा पेशीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी देखील गुणधर्म आहेत. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी स्टीविया खूप फायदेशीर आहे. stevia farming

कर्करोग – या औषधी वनस्पतीमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे कर्करोगविरोधी लढते. स्टीवियामध्ये केम्फेरोल नावाचा अँटीऑक्सिडेंट घटक असतो. हे कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतो. स्वादुपिंडाचा कर्करोग रोखण्यासाठी हे विशेषतः उपयुक्त आहे.

वजन कमी करण्यास मदत – स्टीविया ही वनस्पती गोड असूनही कॅलरीज खूप कमी असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही साखरेऐवजी आहारामध्ये स्टीवियाचा समावेश करू शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

रक्तदाबाची समस्या – स्टीवियामध्ये ग्लायकोसाइड्स असतात. जे शरीरातून अतिरिक्त सोडियम काढून टाकण्यास मदत करतात. हे रक्तदाब पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. हे हृदयविकाराचा धोका कमी करते.

Tags: Agricultre NewsAyurvedicForeststevia farming
SendShareTweet

ताज्या बातम्या

Havaman Andaj

Havaman Andaj : गणेशविसर्जनाला मुसळधार पाऊस? पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता; तुमच्या गावात पाऊस पडणार?

September 28, 2023
Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

September 27, 2023
Government Contractor

Government Contractor : सरकारी ठेकेदार होण्यासाठी कशी असते परवाना प्रक्रिया? या ठिकाणी करावा लागेल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

September 26, 2023
Crop Management

Crop Management : सुधारित बी-बियाणे, खते आणि पीकसंरक्षके तसेच संप्रेरके या संदर्भातील माहिती देणाऱ्या संस्था कोणत्या? जाणून घ्या

September 25, 2023
Spinach Farming

Spinach Farming : पालकाच्या ‘या’ जाती पिकवल्या तर मिळेल भरघोस नफा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

September 25, 2023
Agriculture News

मुख्यमंत्रांनी घेतला मोठा निर्णय! दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन चारा पिकांसाठी काढला जीआर

September 24, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group