भटकी जनावरे शेतात फिरकणार नाहीत, ‘हे’ उपाय करा आणि आपली शेती पिके वाचवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पिके जनावरांमुळे खराब झाल्याची तक्रार शेतकरी अनेकदा करतात. अशा परिस्थितीत त्यांना आर्थिक फटका बसतो. अनेक ठिकाणी कुंपण घालण्यात येते. त्यामुळे अनेक जनावरांचा मृत्यूही होतो. अनेक राज्यांमध्ये तारबंदी देखील आहे. आजच्या लेखात काही नैसर्गिक मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे पिकाला प्राण्यांपासून वाचवता येते.

१) स्प्रे 

आजच्या काळात भटक्या प्राण्यांची समस्या सोडवण्यासाठी बायो-लिक्विड स्प्रे खूप उपयुक्त ठरू शकतो. भटके प्राणी, वन्य प्राणी शेताच्या जवळही येत नाहीत. पिकामध्ये फवारणी केल्यास कोणताही चुकीचा परिणाम होत नाही. उलट त्याच्या वापराने पिकातील कीटक आणि किडींचाही नायनाट होतो.

२) बुजगावणी लावून

शेतकरी पिकांच्या मध्यभागी बुजगावणी लावतात हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. शेतकरी बांधवांचा हा स्वदेशी जुगाड आहे. असे करूनही भटकी जनावरे शेतात जात नाहीत. पिकांचे रक्षण करण्यासाठी कोणीतरी शेतात उभे असल्याचे जनावरांना वाटते, त्यामुळे त्यांना धोका आहे. त्यामुळे भटकी जनावरे शेतात येत नाहीत. शेतकर्‍यांना ते बसवणे खूप किफायतशीर आहे, कारण शेतकरी त्यांच्या घरी स्वतः बुजगावणं तयार करू शकतात.

३) औषधी पिके लावा

शेतकरी शेताच्या कड्याभोवती औषधी पिके लावू शकतात. जनावरांना औषधी पिके खायला आवडत नाहीत. अशा स्थितीत शेताच्या बाजूने औषधी पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होऊन पीक सुरक्षित राहील.

४) काटेरी कुंपण

आपाल्याकडे अनेक काटेरी वनस्पती आहेत ज्या उंच वाढतात. या काटेरी वनस्पतींचे किंवा निवडुंगाचे कुंपण शेताभोवती लावून जनावराना शेतात येण्यापासून रोखू शकता. हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

५) आवाज येणारी यंत्रे

काही शेतकरी आपल्या शेतात जुगाड करून सतत आवाज येणारी यंत्रे बसवतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी देखील जंगली प्राणी आणि भटक्या जनावरांपासून शेती पिकांना वाचवले जाऊ शकते.

error: Content is protected !!